पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ भारतीय साम्राज्य. [ माम वेदांगें. प्रातिशाख्य सूत्र देखील याच शौनकानें केले असून, तोच आश्वलायनाचा गुरु असल्याविषय आख्यायिका आहे. यांत छंदशास्त्राचे विवरण आहे. ह्यांखेरीज, १ शिक्षा, २ छंद, ३ व्याकरण, ४ निरुक्त, ५ ज्योतिष, आणि ६ कल्प अर्शी वेदांगे असून, पहिलीत उच्चारशास्त्र, दुसऱ्यांत छंदशास्त्र, तिसऱ्यांत व्याकरणशास्त्र, चवथ्यांत शाब्दिक टीका व कठिण शब्दांचें विवरण, पांचव्यांत ज्योतिःशास्त्र, आणि सहाव्यांत आ- चार विधि, इत्यादि सर्वोचें यथावकाश विवेचन केले आहे. शिक्षा, मंडूकानें आणि पाणिनीनें केली असून, छंद पिंगलानें, व ज्यो- तिष लगधाचार्याने केले आहे. शिक्षा. छंद व ज्योतिष शास्त्र. ऋग्विधान ह्मणूनही एक ग्रंथ आहे. त्यांत गूढ मंत्रशक्तीचें व प्रत्येक ऋचोच्चारणाच्या सामर्थ्याचे वर्णन आहे. ऋग्वेदाच्या आलोकनानें मानवी जातीच्या आद्य- ऋग्वेदाच्या आ- स्थितीचें तथ्य व मूलस्वरूप दृग्गो- लोकनानें जगाचें क- चर होतें. आणि सुमारें नऊदहा हजार वर्षीमार्गे आमचे आर्य हिंदु कशा प्रकारें बोलत चालत होते; त्यांचे मनोव्यापार काय होते; त्यांची धर्मरचना कशी होती; ती पुढें कशी बदलत क्याण,