पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेदन वेदांगें. १४१ आहेत. श्रौत सूत्रे आणि गृह्य सूत्रे. ऋग्वेदांचीं सूत्रें. श्रौत सूत्रांत आश्वलायन सूत्रांचे त्यांतील विषय. बारा अध्याय असून त्याचा ऐतरेय ब्राम्हणाशी संबंध आहे; व शांख्यायन सूत्राचे अठरा अध्याय असून शांख्यायन ब्राम्हणाशी संबंध आहे. या श्रौत सूत्रांत यज्ञयागादि विधींचे संपूर्ण कथन, व वाजपेय, राजसूय, अश्वमेध, पूरुषमेध, सर्वमेध, इत्यादि यज्ञांचें सूक्ष्म विवेचन केलेले आहे. गृह्य सूत्रांत, आश्वलायन गृह्य सूत्राचे चार अध्याय, व शांख्यायन गृह्य सूत्राच सहा अध्याय आ हेत. यांत वर्णाश्रम धर्म, परिणयविधि, नित्यनैमित्तिक कर्म, उत्तरकार्यविधि, आणि पितृतर्पण, यांचें सविस्तर कथन आहे. सदरहू दोन्ही गृह्य सूत्रांवर नारायणाची टीका असून आश्वलायन श्रौत सूत्रांवरही त्याचीच टीका आहे. वेदानुक्रमणी. याशिवाय अनुक्रमणी नामक ऋग्वेदाचे ग्रंथ आ हेत. त्यांत छंद, त्यांच्या देवता, आणि त्यांचे प्रवर्तक, याविषयी वि वेचन आहे. तिचे दोन पोट विभाग आहेत. अनुवाकानु- क्रमणी व सर्वानुक्रमणी. पहिली शौनकानें, आणि दुसरी कात्यायनानें केलेली असून त्या दोहोंवरही षड्गुरूची उत्तम टीका आहे. ऋग्वेदसंहितेचे विद्यमान असलेले