पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग कौषीतकारण्यकाचे आरण्यक अशी संज्ञा आहे. यांपैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या भागास ऐतरेय उपनिषदेंही ह्मणतात. तीन भाग आहेत. त्यांपैकी पहि- ल्या दोन भागांत यज्ञयागविधीं सांगितला असून तिसऱ्या भागांत मात्र उपनिषत्कथासार आहे; व त्यास कौषी- तक्युपनिषद् असे म्हणतात. हे उपनिषद् अत्युपयुक्त आणि विशेष महत्वाचें असून, त्याच्या पहिल्या अध्या- यांत स्वर्गवासाचें सौख्य व तद्विषयक विवेचन आहे. दुसऱ्या अध्यायांत तत्कालीन कुटूंबप्रीति, प्रेम-बंधन, स्नेहातिशय, आणि तीक्ष्ण वात्सल्य, हीं उत्कृष्ठ रीतीनें व्यक्त होतात. तिसऱ्या आध्यायांत ऐतिहासिक काव्य- कथा, तिचा उपचय, आणि क्रमशः विकास, यांचें पूर्ण दिग्दर्शन होतें. या उपनिषदांत भूगोलशास्त्राच्या मूलतत्वांचें प्राचुर्य दिसून येतें. कारण, पहिल्या अध्या- १४० ऐतरेय आरण्यकाचे पांच भाग. त्यांतील ऐतिहासिक बीज, व भृगोल विद्येचें मूलतत्व. यांत गंगानदीचा उल्लेख असून, तदनंतर क्रमाक्रमानें उत्तर सरहद्दीवरील हिमवंत व दक्षिण सरहद्दीवरील विंध्याद्रि, यांचे वर्णन, आणि त्या पर्वतांनी परिवेष्टित अशा प्रांतसमूहांतील व तन्निकट प्रदेशांतील जातिव- र्गाच्या परिसंख्येचें विवेचन, त्यांत आढळून येतें. ऋग्वेदाची सूत्रेही आहेत, व त्यांचे दोन प्रकार