पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा वेद व वेदांगें. आठ पंचिका केल्या आहेत. कौषीतकी ब्राम्हणांत एकंदर तीस अध्याय आहेत. ऐतरेय ब्राम्हणाच्या दुसऱ्या अध्यायांत कांहीं कथानकें सांपडतात, त्यावरून त्यांत इतिहा- सोपन्यासाचीं मूलतत्वें दृष्टिगोचर होतात, असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाहीं. ऐतरेय ब्राम्हणावर सायनाचा- र्याची टीका असून, कौषीतकी ब्राम्हणावर माधवाचा पुत्र विनायक याची टीका आहे. ऐतरेय ब्राह्मणाचीं देखील आरण्यकें आहेत. ह्यांचा अभ्यास ऋषींनी व त्यांच्या शिष्य- वर्गीनी अरण्यांतच केला पाहिजे असे असल्यामुळे, आरण्यक हें अन्वर्थ- ऐतरेय ब्राह्मणाची आरण्यकें, व त्यांतील विषय. नांव त्यांस दिले आहे. यांत अध्यात्म विद्येसंबधींच समग्र विवेचन असून, निर्वाणपद प्राप्त होण्यासाठी हिंदूंनी अति गहन परायणता, उदार तप, आणि उत्कट ईश्वर- मक्ति, यांचे मनःपूर्वक अवलंबन केलेले असल्याचे दिसतें. व त्यासंबंधानें त्यांची अखिल भूतलावर कीर्तीही आहे. ऐतरेय आरण्यकाचे पांच भाग असून त्या प्रत्येकास “ This forest-life evidently only a later develop- ment in Brahmanical contemplation, and it is to it that we must chiefly ascribe the depth of speculation, the complete absorption in mystic devotion by which the Hindus are so eminently distinguished. " ( History of Indian literature By Professor Weber P. 48 ) १