पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग अभिदेवता. अग्नि हा हविर्देवता असल्यामुळे, त्याचा स्तुतिपाठ ठिकठिकाणी आढळतो. तो मनुष्यगण, आणि देवयोनी, यांमध्यें दूतरूपानें व मध्यस्थासारखा असून, तो आपल्या उज्ज्वलित ज्वालाग्रांनीं अति दूरस्थ देवांसही होमार्थ पाचारण करी, व अग्नीच्या तेजाला भिऊन सर्व देव-समूह त्याची आज्ञा मान्य करी, अशी तत्कालिन हिंदू लोकांची समज असे. इंद्र हा पवीश्वर असल्या कारणानें कृष्णमेघजालाचें विदारण करून तो पृथिवीवर जलवृष्टि देखील आवाहन केलेले आहे. अरुण, उषस्, आणि सूर्य यांच्या तेजोरा- शीनें मनाला मोठा विस्मय वाटून, पूर्ण भक्तीनें व अत्यादरानें त्यांचाही धांवा केल्याचें व्यक्त होतें. याशिवाय मरुत्, रुद्रगण, आणि अनेक देवता- समूह यांचें सुद्धां वेळोवेळी आवाहन करून, त्यांच्या ठायीं व्यक्तिनिर्देश केल्याचें आढळतें. सूर्य व इतर देवता. इंद्र देवता. करतो; सबब त्याचें C ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण आहेत. ऐतरेय ब्राम्हण, आणि शांख्यायन किंवा कौषीतकी ब्राह्मण. ऐतरेय ब्राम्हणांत सोमयज्ञाविषयींच समग्र निरूपण असून, कौषीत की ब्राम्ह् ऋग्वेदाचे ब्राह्मण, णांत फक्त त्याविषयींचेंच मुख्यत्वेंकरून विवेचन आहे. ऐतरेय ब्राम्हणांत एकंदर चाळीस अध्याय असून त्याच्या