पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा ] वेद व वेदांगें. १३७ सर्व वेदांत मुख्य वं अति प्राचीन म्हटला ह्मणजे ऋग्वेदच होय. ऋग्वेद संहितेत दोन विभाग दृष्टीस पडतात. त्यांपैकी पहिला विभाग अगदी पुराण असून त्याचे दहा भाग केलेले आहेत. त्या प्रत्येकास मंडल असे ह्मणतात. त्यांत ८५ अनुवाक, १०१७ सूक्ते, आणि १०५८० ऋचा आहेत. प्रत्येक सूक्तांत सुमारे दहा ऋचा असतात. दुसरा विभाग त्यानंतरचा असून त्याचे एकंदर आठ भाग केलेले आहेत. त्यांस अष्टकें ह्मणतात. ह्यांचे आठ अध्याय केलेले असून त्या प्रत्यकाचे तेहेतीस वर्ग आहेत. एकंदर वर्ग २००६ दोन हजार सहा असून त्या प्रत्येक वर्गांत पांच ऋचा आहेत. ही मंडले व अष्टके निरनिराळ्या ऋषींनी रचलेली असल्याचें दिसतें. उदाहरणार्थ, पहिलें व दहावें मंडल भिन्न भिन्न गोत्रांतील ऋषींनी केलेलें मंडलांचे प्रवर्तक. आहे. दुसरें गृत्समदानें, तिसरें विश्वामित्रानें, चवथें वामदेवानें, पांचवें अत्रीनें, सहावें भारद्वाजानें, सातवें वशिष्टानें, आठवें कण्वानें, आणि नववें अंगिरसानें. सदरहू नांवांवरून त्या त्या नांवांचे ऋषी व त्यांचे गोत्रज समजण्याचे आहेत. ऋग्वेदसंहितेंत अग्नि, इंद्र, सूर्य, वगैरे देवतांचें स्तवन केले आहे, तथापि त्यांतही अग्नि- देवतेला श्रेष्ठतर मानल्याचे दिसतें. ऋग्वेद संहिता, व मंडले.