पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग ह्मणण्यास कांहींच हरकत नाहीं. ह्या वेदावलोकना- वरून अर्से कळून येतें कीं, आमच्या आयच्या मूल- वस्तीचें लक्षांत ठेवण्यासारखे फार प्राचीन स्थान म्हटले ह्मणजे उत्तर हिंदुस्थान, त्याच्या वायव्यदिशेकडील प्रांत, आफगाणिस्थान, आणि त्याच्या आसमंतांतील प्रदेश, हे होत. किंबहुना, आमच्या आर्याचे आणि अखिल मानवी जातीचें आद्य निवासस्थान हिंदुस्थानच असावें. इतकेच नाहीं तर, ह्या भरतभूमीशिवाय त्यांची प्रथमची वस्ती इतर ठिकाणी कोठेही नसावी, असे ह्मण- ण्यास अंतःप्रमाणांवरून विशेष बाघ येईल असे वाटत नाही. कारण, आमचे वेद, आमची पुराणे, आणि आमचीं ऐतिहासिक त्याविषयों वेद व पुराणांतील प्रमाण. १ एक प्रसिद्ध फ्रेंच पंडित क्रूझर हा असे लिहितो की, हिंदुस्थान हेच अखिल मानवी कुटुंबांची जन्मभूमि होय. निदान एकंदर मानवी जातीची आद्योन्नति तरी येथेंच उदयास येऊन, ती येथेंच विकासाप्रत पावली. येथूनच ती जगांतील इतर भागांत झणजे प्राचीन व अर्वाचीन खंडांत पसरली. आणि मनुष्याचें जीवन जें ज्ञान त्याचा प्रसार देखील येथूनच होऊन, ते सर्वत्र फैलावलें:- 66 If there is a country on earth, which can justly claim the honour of having been the cradle of the human race, or at least the scene of a primitive civilization, the successive developments of which carried into all parts of the ancient world, and even beyond the blessings of knowledge which is the second life of man, that country assuredly is India'