पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग आरण्यकांचे पठण अरण्यांत करावें लागत असल्या- वेदांची आरण्यकें. मुळे, त्यांस आरण्यकें अशी संज्ञा आहे. हीं आरण्यकें ब्राह्मणाच्या परिशिष्टासारखीच असून त्यांत सर्व उपनिषदांचा समा- वेश होतो. व यांतच अध्यात्म ज्ञानाचें यथार्थ विवेचन केलेले आहे. वेदांचीं सूत्रे. प्रत्येक वेदांची सूत्रे निरनिराळी असून तीं भिन्न भिन्न ऋषींनी केलेली आहेत. त्यांत श्रौतसूत्रे व गृह्य सूत्रे असे दोन प्रकार आहेत. श्रौत सूत्रांत यज्ञयागादि विधींचें सविस्तर विवेचन असून, गृह्य सूत्रांत वर्णाश्रम धर्म, अणि नित्य- नैमित्तिककर्म, यांविषयींची साद्यन्त हकीकत आहे. सर्व वेद प्रायः वेदांतील विषय. आहे. ऋग्वेदांत छंदोबद्धच आहेत. मात्र यजुर्वेदाचा कांही भाग गद्यरूप आहे. प्रत्येक वेदांतील विषय-योजना निरनिराळी अग्नि, इंद्र, सूर्य, इत्यादि देवतांची स्तुति असून, यजुर्वेदांत यज्ञप्रकरण आहे. सामवेदांत ऋग्वेदांतीलच ऋचा असून, त्या फक्त गायनाच्या रीती- प्रमाणें ह्मणावयाच्या आहेत. अथर्ववेदांत गृह्य सूत्रांतील कथाभाग असून शिवाय भैषज्य, शापक्रिया, इंद्रजाल, मंत्रयोग, आणि शुभाशुभ लक्षणविचार, या विषयांवर विस्तारानें विवेचन केलेलें आहे.