पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगें. आणि ४ सुमंतु, असे यथानुक्रमानें असल्याचे पुराणांतरीं वर्णन आहे. प्रत्येक वेदांत संहिता, ब्राह्मण, आरण्यकें, आणि सूत्रे, अशी असतात. संहिता ह्मणजे मूळ वेदमंत्र. ब्राह्मण ह्मणजे त्यांवर टीकारूप व्याख्यान. आरण्यकें झणजे उपनिषदादि भाग. आणि सूत्रे ह्मणजे वर्णाश्रम धर्माचें विवेचन होय. प्रत्येकवेदाची सं. हिता. प्रत्येक वेदाची संहिता अगर्दी निराळी असून तिचे पुनः पदें, क्रम, जटा, घन, रेखा, शिखा, असे अनेक प्रकार सुरू झालेले आढळतात. संहिता ह्मणजे मूळ संहित स्थितींत असलेला वेदमंत्रच असून, त्यांचे जे पदविभाग तीं पदें होत. क्रम ह्मणजे ऋचांचा अनुक्रम, व हा प्रत्येक संहितेचा निरनिराळा आहे. ब्राम्हणे हा शब्द नपुंसकलिंगी आहे. ही ब्राम्हणें प्रत्येक वेदांची पृथक् पृथक् आहेत. वेदांचीं ब्राह्मणे. जसे ऋग्वेदांवर ऐतरेय व शां- ख्यायन, किंवा कौषीतकी ब्राह्मण. यजुर्वेदाच्या दोन शाखा आहेत. त्यांपैकीं कृष्ण यजुर्वेदावर तैतिरीय ब्राह्मण, आणि शक्ल यजुर्वेदावर शतपथ ब्राह्मण. सामवेदावर ताण्ड्य, अद्भूत, छंदोग्य, प्रौढ, पंचविंश अथवा महाब्राह्मण, आणि अथर्व वेदावर गोपथ ब्राह्मण. यांत बहुतकरून यज्ञक्रियांविषयींचा उल्लेख असतो.