पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा ] वेदकालीन मनाची युवावस्था, किंवा पू वार्ध. वेद व वेदांगें. १२३ प्रचारांत होते. परंतु कालगतीनें ही मनाची बाल्यदशा जाऊन त्याला तरुणावस्था प्राप्त झाली. त्यामुळे दिवसानुदिवस बुद्धि जास्त प्रगल्भ होऊन मनाची विचार- शक्ती जास्त वाढत चालली. अशा स्थितीत अनेक देवता- प्रभुत्व विलयास गेलें, व एकंदर देवता समुदायाच्या तीन कोटी ठरविण्यांत आल्या; १ भूदेवता, २ आकाश- देवता, आणि ३ स्वर्देवता. ह्या व्यवस्थेनें अनेक देवतांचें एकीकरण होऊन प्रत्येक देवतेचा सदरहू तीनपैकी कोण- त्या तरी एका कोटींत समावेश करण्यास उत्तम साधन मिळाले. या कारणानें प्रथमावस्थेत उत्पन्न झालेल्या विचारांचा व कल्पनांचा बालिशपणा जाऊन, त्यांस गांभीर्य व तीव्रता पुष्कळ अंशीं प्राप्त झाली. ह्या दशेंतही बराच काळ लोटला असावा. तदनंतर सदरहू दोन्ही प्रकारच्या स्थितींत म्हणजे मनाच्या बाल्ययुवावस्थेत, विचारशक्तीनें आणि स्थिर अभ्यासाने त्या मनास उत्तम प्रकारचें शि- क्षण मिळाले. शिवाय त्या प्रत्येक अवस्थेत झालेल्या स्थित्यंतराचाही चांगला अनुभव क्रमशः प्राप्त झाला. वेदकालीन मनाची त्यामुळे, हे पूर्वार्ध लोटून उत्तरार्धीत वृद्धावस्था, किंा उत्त- , रार्ध. मनाचा शिरकाव होतांच, त्याची विचारसरणी शनैः शनैः विकास मनोभास्कराचा पूर्ण उदय होण्यास पावत गेली; आणि