पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ भारतीय साम्राज्य. [ भाग उत्कृष्ट संधि सांपडली, व पुष्कळ अवकाशही मिळाला. त्यायोगानें सार कोणतें व असार कोणतें, ग्राह्य कोणतें व त्याज्य कोणतें, नित्य कोणतें व अनित्य कोणतें, इत्यादि गोष्टींचा व कार्याकारणभावाचा पूर्ण ठसा त्यांच्या मनावर बिंबत गेला. तेव्हां अर्थातच अनेक देवतासमूह, किंवा पंचमहाभूतें, अथवा देवता वर्गत्रय, यांची स्वतंत्र शक्ति नसून त्या सर्वांचें आदिकारण निराळेंच आहे, व तेंच सर्वत्र भासमान होतें असें त्यांस वाटू लागलें. हे आदि- कारणच सर्व शक्तिमान् असून, भासमान होणारी यच्चावत् वस्तु त्याचेंच विराट् स्वरूप आहे, आणि हीं पंचमहाभूतें देखील त्याचेच केवळ गुलाम व बंदे नोकर आहेत. तेंच आदिकारण उत्पत्ति, स्थिति, व लय, या अवस्थात्रयांचें सर्व वस्तूंच्या अना दिसिद्ध अशा एक कारणाविषयीं आर्यांची अचल श्रद्धा. जांची हळू हळू पूर्ण खात्री झाली, व त्याच आदिकार- नियामक असून त्याच्या सत्तेशिवाय आणि आज्ञेखेरीज झाडाचें पानही हालत नाहीं, अशी आमच्या पूर्व- णाच्या विलक्षण शक्तिप्रभावावर त्यांची अचल श्रद्धा बसली. ह्या श्रद्धेचें तथ्य स्वरूप, भीषास्माद्वातः पवते । भीषोदयति सूर्यः । भीषास्मादग्निवेन्द्रश्च । मृत्युर्धावतिपंचमइति । ह्या उपनिषदांतील महावाक्यांत चांगले प्रतिबिंबित होतें.