पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग प्रथम उद्दाम असून, ती अगदीं बा- ल्यावस्थेतच होती असें म्हटलें तरी चालेल. त्यावेळी, प्रथम त्यांच्या मनावर बाह्य सृष्टिचमत्कृतीचा संस्कार होऊन, पृ- थिवी, आप, तेज, वायु, आणि आकाश, या पंचत- त्वांनीं त्यांच्या चित्तवृत्तीवर आपला भरपूर अम्मल बस- विला. त्यामुळे त्या सर्व तत्वांस देवता कल्पून, आपलें सर्वस्वी पोषण आणि सर्वतोपरी सांभाळ करणारे, व यथाकालीं इच्छित मनोरथ पूर्ण करणारे, हेच लोकपाल आहेत असे समजून त्यानीं त्यांचा मनोभावानें व अति प्रेमपूर्वक धांवा केला; आणि जी जी उणीव त्यांस भासूं लागली ती ती पुरी पाडण्याविषयीं त्यांनीं उचित काळीं त्यांची यथामति प्रार्थनाही केली. ह्या अवस्थेत सर्व तत्वांच्या शक्तीचें त्यांस पूर्ण रीतीनें आकलन झालेले नसल्यामुळे, जी जी पृथक्शक्ति भिन्न भिन्न काळीं भास- मान झाली, तो ती सर्वथैव श्रेष्ठ आहे असें त्यांनी त्या त्या वेळीं मानिलें. तदनंतर कालगतीनें अकरा भूदेवता, अ- करा स्वर्देवता, व अकरा आकाशदेवता अशा त्यांनीं कल्पिल्या; परंतु तेवढ्यांनींही पूर्तता न होऊन त्यांची सं- ख्या पुढे पुढे इतकी वाढत गेली कीं, तो तीन हजार ति न एकूणचाळीसपर्यंत येऊन पोहोंचली. याप्रमाणे बराच कालपर्यंत अनेक देवता श्रेष्ठत्व १२२ वेदकालीन मनाची बाल्यावस्था.