पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा ] वेद व वेदांगें. त्तीचें माहेर घर, व सुखाचें इंद्रभुवन करून सोडणें, ह्म- णजे खरोकर हजारों वर्षीचें व सतत परिश्रमाचें काम होय. आणि रामायणांतील विजयाला व महाभारतां- तील तुमुल युद्धालाच जर हजारों वर्षे लोटलीं आहेत, तर मग वेद हे दहा हजार वर्षांपूर्वीचे असावेत, असे मान- ण्यास कोणती हरकत ? कारण प्रथमतःच त्यांची निर्मिती असून तदनंतर रामायण, महाभारत, वगैरे महाका- व्यांतील गोष्टी घडून आल्या आहेत, हें जास्त सांगा- वयास नको. याप्रमाणें बाह्य व भूशास्त्रविषयक प्रमाणांनी सुद्धां वेदांचें अति पौराणत्व सिद्धवत् ठरल्यामुळे, आतां ४ थें जें आभ्यंतर प्रमाण हे त्यांचें पौराणत्व सिद्ध करण्याच्या कामीं कितपत उपयोगी पडतें, याविषयीं विचार करूं. वेदांपैकीं आदिवेद म्हटले म्हणजे ऋग्वेद होत. याचें अव्वलपासून अखेरपर्यंत साद्यंत अवलोकन केले म्हणजे एकंदर हिंदु- लोकांच्या मनाच्या स्थित्यंतराचा आभ्यंतरप्रमाणाव- रून वेदपौराणत्वाची सिद्धि. इतिहास, अथपासून इतिपर्यंत समग्र कळून येतो. इत- केंच नाही तर, त्यांच्या मनोगतीत क्रमशः कसकसे फेर- फार होत गेले, आणि शेवटीं ते उन्नतीच्या कोणत्या प राकाष्ठेच्या अवस्थेप्रत पावले, याचें उत्तम दिग्दर्शन त्यांत होतें. आमच्या वेदकालीन हिंदूंच्या मनाची स्थिति ११