पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग हल्लींच्या स्थितीतल्या महदन्तराचे दिग्द- र्शन. ही कीं, हल्लीं सारखे त्या पुरातन काळी, त्या वेळच्या वह्मणजे सुमारें आठ दहा हजार वर्षी- मार्गे, दळण वळणाचें बिलकुल साध- नच नव्हतें. आज मित्तीस म्हटले तर आपणाला हं हं म्हणतां शेंकडों कोसां- ची मजल करता येईल. निमिषार्धीत म्हटल्या ठिकाणीं हवीती बातमी देतां येईल. नेमलेल्या ठिकाणी पाहिजे ती सामग्री पोहोचवितां येईल. आणि नियमित वेळीं, हवात्या प्रकारचा, पाहिजे त्या ठिकाणीं, व अनेक साधनांनी हरत- हेचा बंदोबस्तही करता येईल. कारण, रस्ते, सडका, लोहमार्ग, तारायंत्र, वगैरे नाना प्रकारची साधनें हल्लीं उपलब्ध आहेत. परंतु ह्यांपैकी एकाही गोष्टीची त्या काळ अनुकूलता नव्हती. त्या वेळेस म्हटले म्हणजे जिकडे तिकडे जंगली प्रदेश, अफाट अरण्ये, खडकाळ मुलूख, रेताळ मैदानें, विशाळ नद्या, आणि विस्तीर्ण पर्वत, असे इतस्ततः चोहोंकडे असून, कोठेंही दळणवळणाचे मार्ग, किंवा प्रवासाची साधनें, बिलकुल नव्हती. यामुळे, एका प्रदेशांतून दुसऱ्या प्रदेशांत जाणे म्हणजे महत् प्रयासाचें, अति कष्टाचें, आणि विशेष दिनावधीचें काम असे. अशा वेळीं, देशांत नवीनच वसाहत करून एकामागून एक असे देश जिंकणे, जिंकलेल्या लोकांस आचार विचारसंपन्न करणे, त्यांस विद्याज्ञान देणें, आणि एकंदर देश, ज्ञानाचें भांडार, संप- १२०