पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगें. चिरकाल राही असा उमटला. कल्पना करा की, येवढी मोठी घडामोड होण्याला हजारों वर्षे गेली असली पाहि- जेत ! ! ! प्रथमतः या देशांत आपली स्थिति चिरकाल राही अशाविषयी हिंदूंचा प्रयत्न; तदनंतर अधिवासित देशाचा शनैः शनैः संप्रसार; त्यांच्या प्राथमिक अवस्थेत त्यांच्या मनांतील नैसर्गिक उद्गार; त्यांची काव्यरचना, घर्मरचना, व सामाजिक रचना; त्यांचा बुद्धिप्रभाव व त्याचा समाजावर एकंदर पारणाम; त्यांच्या मनोविकासाचें क्रमाक्रमानें स्थित्यंतर; त्या मनोविकाराची नूतन म्हणजे बाल्यावस्था, तारुण्यदशा, आणि वृद्धावस्था म्हणजे ती पूर्णस्थितीप्रत पोहोंचण्याचा काल; तदनंतर प्राप्त झालेली विकास वैचित्र्याची पूर्णावस्था; त्यांची पराक्रमशीलता व महत्वाकांक्षा, आणि ती सफल होण्याविषयी त्यांचे अश्रांत श्रम व दीर्घोद्योग; ह्या सर्व गोष्टी मनांत आणिल्या म्हणजे, येवढा अफाट देश पादाक्रांत करून त्यांतील रानटी आणि बलवान् लोकांवर आपली एकछत्रीसत्ता बसवि- ण्याला, तसेंच एका टोंकापासून तो तहत दुसऱ्या टोंका- पर्यंत राजकीय व ब्राह्मण धर्माचें अप्रतिहत साम्राज्य स्थापन करण्याला, अनेक शतकें लोटली असावीत, यांत यत् किंचितही शंका नाही. या वेळच्या स्थितीत, दुसरी एक महत्वाची आणि विचार करण्यासारखी गोष्ट मनांत आणिली पाहिजे, ती