पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ भारतीय साम्राज्य. [ भांग सेतुबंध रामेश्वर उल्लंघून, त्यांनी आपला तळ सुप्रसिद्ध रावण नगरीत (लंकेंत) च दिला; आणि तेथील बलाढ्य लंकाधिपतीस पदच्युत करून, अखेर आपलेंच प्रभुत्व व एकछत्रीराज्य स्थापन केलें. अशा प्रकारचें अति साहसाचें व दीर्घ प्रयत्नाचें काम हिंदुलोकांनी हाती घेऊन शेवटास नेर्ले. ह्यांत त्यांची एकनिष्ठा व चित्तासक्ति, धैर्य व उद्यम सातत्य, पराक्रमशीलता आणि स्वावलंबन, हीं उत्तम रीतीनें व्यक्त होतात. हें हिंदुसाम्राज्य बराच कालपर्यंत चालल्यावर, शें- कडों वर्षांनंतर, त्याच्या विभागाबद्दल युधिष्टिराचें साम्राज्य दैवदुर्विपाकानें आपसांत मोठीच या- दवी सुरू झाली. एक पक्षाला धृतराष्ट्राचे दुर्योधनादि शतपुत्र असून, प्रतिपक्षाकडे युधिष्ठिरादि पंचकडी होती. पहिल्या पक्षाला कौरव अशी संज्ञा असून दुसऱ्या पक्षांत पांडव, आणि त्यांचे अनुयायी होते. या पक्षद्वयांत शेवटीं मोठें तुमुल युद्ध होऊन, जयश्रीनें अखेर पंच पांडवांच्या गळ्यांतच माळ घातली. त्यामुळे सर्वात वडील या नात्यानें धर्मासच राज्यपद प्राप्त झाले. त्यानंतर ब्राह्मणी धर्म सर्व हिंदुस्थानभर मोठ्या झपाट्यानें पसरला. आणि हिंदूंच्या राजकीय व धर्म साम्राज्याचा ब्राम्हणी धर्माचा सर्वत्र प्रसार. उसा हिमालयापासून तो तहत् सिंहलद्वीपापर्यंत जिकडे तिकडे