पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा ] वेद व वेदांगे. ल्याचें दिसतें. त्यानंतर क्रमाक्रमानें त्यांनी सरस्वति नदीच्या पलीकडे जाऊन, थेट गंगा (ह्मणजे भागीरथी) नदीपर्यंतचा प्रदेश काबीज करून तो व्याप्त केल्याचें, त्या पुढील वेद ऋचांवरून उघड होतें. तदनंतर काल- वशात विंध्याद्री ओलांडून हे लोक सरकत सरकत सह्याद्रीनजीक येऊन ठेपले. येथील प्रांत अति वि- शाल आणि अरण्यमय असून त्यांत भील, किरात, वगैरे मूळच्या राहणाऱ्या रानटी लोकांची वस्ती होती. हे लोक फारच क्रूर व भयंकर असून, त्यांच्या एकंदर स्थितीचा विचार केला तर ते पशुतुल्यावस्थेतच होते, असें ते ह्मटले तरी चालेल. अशा प्रकारच्या सर्व लोकांस पराजित करून दंडिकारण्यासारखीं भयानक वनें, व ओसाड आणि निर्जन प्रदेश, त्यांनी एकामागूनएक हस्तगत केले. पुढें सह्याद्रि व पूर्वघाट या पर्वतद्वयांची दक्षिण सरहद्द जो उच्च नीलगिरी, तो शनैः शैन परंतु दृढनिश्चयानें उत्क्रमून, आमचे अतिपुराण काळचे हिंदुलोक आपली विजयध्वजपताका फडकावीत फडकावत, थेट कन्या- कुमारका टोंकापर्यंत येऊन पोहों- चले, तदनंतर हिमालयापासून तो तहत् सिंहलद्वीपापर्यंत, अखिल भरत खंडांत व त्या- च्याही पलीकडे आपलेंच साम्राज्य स्थापन करण्याच्या महत्वाकांक्षेनें, प्रचंड हिंदी महासागर व अति पवित्र रामचंद्राचे साम्राज्य.