पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भांगे हजार वर्षे होय. ह्या गृहस्थानें ऐत- रेय ब्राह्मणावर एक सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे. ह्याला सुमारें पंधरा वीस भाषा येत असून, त्यास इतिहासाचें ज्ञान फारच चांगले होतें. हा हिंदूंच्या कर्ममार्गाचा इतका षोकी होता कीं, त्यानें आपल्या बंगल्यांत एक यज्ञही करविला होता. असो. येणेप्रमाणे वेद पौराणत्व नाक्षत्रिक प्रमाणांनीं निर्वेध सिद्ध झाल्यावरून, आतां २ बाह्य व ३ भूगोलशास्त्र विषयक प्रमाणांनी, त्याची कितपत शाबिती होते याविषयी विचार करूं. ऋग्वेदांतील अगदी प्र- थमच्या ऋचांवरून हिंदुलोक काबुलांतील कुभानदी, वायव्यप्रांत, आणि पंजाब, या प्रदेशांत पसरलेले अस ११६ मार्टिन्हीचे वेदका लाविषयों मत. बाह्य व भूगोलवि- षयक प्रमाण. १. हा वेदकालाचा उत्तरार्ध समजला पाहिजे. वेदकालाचा पूर्वार्ध, इसवी सनापूर्वी, दहा हजार वर्षापासून सम जला पाहिजे. “ Thus the Rigveda, the most ancient work that exists in any language known at present, must have been composed between 6,000 and 4,000 B. C.” “ The period from 10,000 to 6,000 B.C.is also not too much for the development of that primitive Aryan language which : blossom- ed in the Rigveda hymns and branched off in several dialects such as Greek, Zend and Sanskrit. "