पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगें. ११५ पुराणकाळ काढतां येतो. हे साधन म्हटलें म्हणजे सं- पात बिंदूंचें चलन होय. ह्या चलनाचें दिग्दर्शन ज्यो- तिष म्हणून जे एक वेदांग आहे त्यांत केलेले आढळतें, व त्या काळी सूर्य कोणत्या अयनांशावर होता हेही सां- पडतें. हा ज्योतिषग्रंथ लगध नामक ऋषीनें केलेला असून त्यांत त्यानें आपल्या वेळेची अयनवृत्तांचीं संपात- स्थलें सांगितलेली आहेत. त्यावरून अर्से सिद्ध होतें की त्या वेळच्या आणि सांप्रतच्या संपात बिंदूंत तेवीस अंशाचें अंतर पडलें आहे. संपात बिंदू म्हणजे विषुववृत्त व क्रांतिवृत्त यांचा ज्यांत परस्पर छेद होतो ते दोन बिंदू होत. यांस तीस अंश क्रमण्यास अजमार्से दोन हजार वर्षे लागतात; आणि हे प्रतिवर्षास मार्गेच सरकत असतात. त्यावरून गणित केल्याने असे समजतें कीं, ह्या लगध ऋषींच्या ज्योतिषग्रंथाचा काळ १९८१ अक्राशे-ए- क्यांशी वर्षे ख्रिस्ती शकापूर्वी होय. आणि म्हणूनच असा सिद्धांत ठरतो की, जर वेदांगालाच आजमित्तीस सुमारें तीन हजारावर वर्षे होऊन गेली आहेत, तर आमचे आदि वेद निर्माण झाल्याला १०,००० दहा हजारा- वर वर्षे झालीं असावीं, असें पूर्वी दिलेल्या प्रमाणावरून विशेष खात्रीपूर्वक वाटतें. मार्टिन्हौ म्हणून एक विख्यात संस्कृत पंडित होऊन गेला. त्याच्या मतें वेदाचा काल इ० स० पूर्वी दोन