पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा वेद व वेदांगें. व सत्ता, यांच्या उन्मादानें कांहीं गौरकाय ( त्यांच्या स्वतःच्या ज्ञानाच्या संबंधानें आवळ्यायेवढें पूज्य अस- तांही ) दुसऱ्यास किंपदार्थ, व केवळ पशु आणि रानटी समजतात, ही गोष्ट किती आश्चर्याची व खेदकारक आहे बरें ? प्राच्य राष्ट्रांस केवळ मूर्ख समजून, ज्ञानाचें व स- भ्यतेचें आपणच कायते भांडार, ह्मणून आपल्या भोंवतीं आपणच दिवा ओंवाळून घेणें, किंवा ज्या गोष्टीचा आज चार पांच हजार वर्षीमागें हिंदूंस शोध लागला असून ज्याविषयी त्या वेळेसच त्यांनीं भवतिनभवति केली होती अशी एखादी गोष्ट प्राच्य ग्रंथावलोकनामुळे, किंवा प्रसं- गानुसार अकस्मात् अथवा दैवगत्या, पाश्चिमात्यांच्या सहज लक्षांत आल्या कारणाने त्यांनीं वृथाभिमान धरून, त्याब द्दलची आपली शेखी आपणच मिरवावी, हें किती असभ्य- तेचें व दुष्टपणाचें आहे बरें ! आणि त्याबद्दल कोणा समंजस मनुष्यास खेद वाटणार नाहीं ? वृथादर्पाचें कारण. आतां, असा अयोग्य दर्प कां व्हावा, अशाबद्दल का र्याकारण हेतूंचा विचार केला तर अर्से खचित् दिसून येईल कीं, पृथ्वी- वरील सर्व देशांतील पुरी माहिती, व चोहोकडील यथार्थ ज्ञान नसल्यानें, असा अनर्थ होतो. उंबरांतल्या कीटकांप्रमाणें या अर्धवट् विद्वानांस, किंवा ट, फ, करणारांस जो ज्ञानलव प्राप्त होतो, तो एकंदर त्रिभुवनांतील सर्वच ज्ञानोदधी आहे