पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग अशी कल्पना करून त्या मदांतच ते उड्या मारतात, व मनःपूत मार्गानें संचार करतात. प्रसिद्ध कवि भर्तृहरीनें झटलें आहे कीं:- यदाकिंचिज्ञोऽहं द्विपइव मदान्धः समभवम्. तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभवदवलिप्तं मम मनः । यदाकिंचित्किंचिद्बुधजन सकाशादवगतम् तदा मूर्खोस्मीति ज्वर इव मदोमेव्यपगतः ।। ( नीतिशतक.) वास्तविक पाहतां ज्ञानाचा मूळ झरा प्राची दिशेकडूनच निघून, प्राच्य देशांतून मार्गक्रमणा करीत करीत पुढें तो पश्चिम दिशेकडे वळला. त्यामुळे प्राच्य देशाची आर्य- भूमिका ज्ञानजलानें आतीषिक्त झाल्यावर, तिकडूनच थोडा थोडा प्रसाद यहुदी, पारसीक, मिश्र, आणि ग्रीक लोकांस, व त्यांजकडून क्रमाक्रमानें रोमन् लोकांस प्राप्त झाला. तदनंतर रोमचें साम्राज्य रसातळास गेल्यावर युरोपखंडांत जिकडे तिकडे अज्ञानांधकारच पसरला. त्या वेळीं अरबी लोकांनी त्या खंडांत चोहोंकडे विजय- ध्वज लाविला, आणि सर्वत्र ज्ञानाचा पुनश्च प्रसार केला. आतां, अरबी लोकांस देखील आर्य लोकांकडूनच ज्ञान- भांडार मिळालें होतें. वही गोष्ट इतिहासावलोकनानें खरीही ठरते. त्यामुळे आम्हां आर्यापासूनच इतर सर्व राष्ट्रांसज्ञाना- मृत प्राप्त झाले, असे म्हणण्यास बिलकुल प्रत्यवाय नाहीं.