पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० भारतीय साम्राज्य. [ भाग चिरकाल साहाय्यानें, त्यांचें (पाश्चिमात्यांचें ) सर्व कांहीं न्यूनाधिक्य पुरें होत आहे. ह्याच दर्पोन्मादनिद्रावस्थेत पाश्चिमात्य हे नेहेमीं चूर असून, ते मोठ्या आनंदांत दिवस घालवितात. तथापि, ही अवस्था जाऊन, तिक- डील मिथ्यावादी व दुराग्रही लोकांस जेव्हां जागृदवस्था प्राप्त होते, तेव्हां मात्र त्यांस असे वाटतें कीं, आपली गर्वोक्ति व दर्प हीं वृथा असून, प्राच्य राष्ट्रच आपल्यापेक्षां यथान्याय श्रेष्ठतर आहेत. परंतु इतकें मात्र खचित सम- जावें कीं, अशा लोकांस हें खरें ज्ञान झाल्यावर ते दुःखग- तौतच पडल्यासारखे होऊन आपलें शांतिसौख्य सर्वस्वी नष्ट झाले, असे त्यांस निःसंशय वाटू लागते कारण, सर्वांत आपणच काय ते मोठे, व आपणांस स्वर्ग काय तो दोन बोटेंच उरला आहे, अशी नेहमींचीच त्यांची अज्ञानमूलक कल्पना असल्यामुळे, दुसऱ्यापेक्षा आपण कमी दर्जाला पोहोंचलों, ही कल्पना साहजिकच त्यांस अति दुःखद होते यांत नवल ते काय ? अशा लोकांवि- षयीं सत्यप्रिय अशा श्वेतवर्ण बंधूंचा संताप केवळ यथा- न्याय आहे, असें कोणास वाटणार नाहीं? संपत्ति, ऐश्वर्य, मागील पृष्टावरून पुढे चालू. marks our Countryimen in the Dast; though at one period on record the taunt might have been re- versed." (Tod's Rajasthan p. p. 117-118 Vol. I.) >