पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेद व वेदांगें. १०९ दुराग्रही लोकांचें, पाश्चिमात्य राष्ट्रांत, जरी प्राचुर्य आहे तरी, त्यांतही मधून मधून सत्यसूर्याचा चकचकाट भासमान होतच असतो. यामुळे, त्याच्या तडाक्यांत जेव्हां अशा लोकांचें असत्य तमसानें ओतप्रोत भरलेले ग्रंथ सांपडतात, तेव्हां मात्र त्यांची त्रेधा होऊन चिंधड्यान् चिंधड्या उडतात. सबब सत्याचा जय होण्याच्या संबंधानें, ही एक मोठीच अभिनंदनीय गोष्ट मानली पाहिजे. ह्या मिथ्यावादी लोकांची पोकळ बडबड, वृथा- जल्पना, आणि कटुतर जिव्हाचापल्य, हीं पाहून त्यांचेच बंधू गौरकाय सुद्धां, सोद्वेगान्तःकरण होत्साते, त्यांचा तिर- स्कार व कंटाळा करतात. आणि कधीं कधीं तर निष्प्रांजल १३वा] पाश्चिमात्यांचें सत्य- - ही लोकांची फटफ- जिती. बुद्धीनें, व निःशंकपर्णे ते असेही उद्गार टाकतात कीं, पौरस्त्य राष्ट्रांवर इश्वरीकृपा असल्यामुळेच तीं बुद्धीनें सतेज आहेत. आणि हे त्यांचें बुद्धिसामर्थ्य जरी पाश्चिमात्य राष्ट्रांत नाहीं तरी, ती उणीव, पाश्चि- मात्य राष्ट्रांतील वृथाभिमान व मिथ्यादर्प, यांच्या योगानें परिपूर्ण व चांगल्या रीतीनें भरून आली आहे. इतकेंच नाही तर, अखिल जगापेक्षां आपण ( पाश्चिमात्य लोक ) च कायते हुषार व शहाणे आहों, म्हणून जी कांहीं पा- श्चिमात्यांस घमेंडी आहे, तिच्या निरंतर वासानें आणि १ A contempt for all that is Asiatic too often पुढे चालू. १०