पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ भारतीय साम्राज्य. [ भाग किंबहुना, अशा एकमार्गी व घाडसी पाश्चात्यांचें हें ब्रीदच आहे असे म्हटले तरी चालेल. प्राच्यपण्डितांस असले कांहीं साधणे खरोखर कठिण, व तें त्यांस शोभलेही नसतें. मला असे वाटतें कीं, आम्हां हिंदूंची प्राचीन उन्नता- वस्था, तसेंच हिंदूराष्ट्राचें पौराणत्व, आणि त्यांचे विद्याविशारदत्व, हीं कांहीं कांहीं पाश्चिमात्यांस बिलकुल सहन न होऊन, ते आपल्या मनाच्या विष्ठुतावस्थेत, कांहीं तरी अति निंद्य व दुराग्रहाची बडबड करून, जगांतील यच्चयावत् प्रजाजनसमूहास आपलें खरें स्वरूप दाखवितात. मिलनी आपल्या हिंदुस्थानच्या इतिहासांत अशाच प्रकारची कांही विलक्षण कुतर्कशक्ति दाखविली आहे. आम्हां हिंदूंची प्राचीन कोरींव- लेणीं इतकी प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय आहेत कीं, तीं पाहून जगांतील सर्व लोक तोंडांत बोटे घालतात. परंतु आमच्या हिंदु लेण्यांविषयों, मिलचें बालिश मत. १ In his zeal to undervalue the cavern temples of the Hindus, he ( Mr Mill ) even insinuates that they are not artificial. " ( Mill's British India. Wilson's notes. ) " A contempt for all that is Asiatic too often marks our co ymen in the east." ( Tod's Rajasthàn Vol. I P. P.117 / 118)