पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगे. १०१ आं- करणें त्यांस कांहीं तरी शोभले असते. परंतु तसा कांहींच प्रकार नाहीं. ह्या भाषांच्या संबंधानें, या राजश्रीचें ज्ञान पाहिलें तर अकटोपासून विकटोपर्यंत. तसेच त्यांचा ह्यांस गंध देखील नसल्यामुळे, समजण्याच्या नांवानेंही वळ्या येवढें पूज्य. तेव्हां उघडच आहे कीं, सदरहू प्राच्य भाषांच्या निरुपयुक्ततेविषयीं जी कांहीं थोडी- बहूत माहिती आमच्या ह्या आंग्ल विद्वानास मिळाली ती स्वानुभव-सिद्ध नसून, दुसऱ्यांच्या- ओंजळीनें पाणी पिऊन प्राप्त झाली असल्यामुळे, त्यांनीं खरोखर मौनावलंबनच करणे अगदी इष्ट होतें. परंतु मो- ठ्या खेदाची व परम आश्चर्याची गोष्ट ही कीं, हे पण्डित त्या भाषांचें स्वतःचें अज्ञान सर्वथैव कबूल करीत असून देखील, ते तत्संबंधी आपले मत प्रसिद्ध करण्यास बिल- कुल मार्गे पुढें सरत नाहींत. असें धाडस, असा विचार, आणि अशी घृष्ठता केवळ त्यांची त्यांसच शोभतें. १ “ I have no knowledge of either Sanskrit or Arabic. But I have done what I could do from a correct estimate of their value. I have read translations of the most celebrated Arabic and Sanskrit works. I have conversed both here and at home. with men distinguished by their proficiency in the eastern tongues. I am quite ready to take the Oriental learning at the valuation of the Orientalists themselves. ( Minute on Education ).