पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगें. ९९ काव्याशीं संस्कृत व आरबी भाषांची तुलना करण्यास त्या बिलकुल पात्र नाहीत. अथवा साक्सन व नार्मन् पूर्वजांच्या भाषेपेक्षां संस्कृत विद्येची बिलकुल अधिक किंमत नाहीं. असा महासिद्धांत मेकालेसारख्या आंग्लभौम पंडितांनी एकदम अविचारानें ठोकून देऊन आपला मूर्खपणा, समवृत्तिशून्यता, आणि अज्ञान मात्र, जगास दाखवावें, यासारखें दुसरें नवल ते काय ? ज्यांस संस्कृत किंवा आरबी भाषेचा यत्किंचित् गंधही नाहीं, त्यांनीं तरी निदान असल्या गर्वोक्तीची वृथा बडबड करूं नये. तसेंच, आपल्या नांवाला चिरकाल कालिमा जोडेल, किंवा आपल्या राष्ट्रास निरंतर कलंक लागेल, अशा धृष्टपणाच्या कृत्यांत कांहीं लाजेकाजेस्तव तरी, पडूं नये हें बरें !!! जी भाषा अत्युत्तम व उत्कृष्ठ आहे; जिची रचना विलक्षण आहे; जी ग्रीक भाषेपेक्षाही जास्त पूर्णतेस आली आहे; व जिच्यांत शब्दप्रकाशन आणि ओजस् हे गुण लाटिन् भाषेपेक्षाही अधिकतर आहेत, ह्मणून अनेक भाषाकोविद प्रसिद्ध सर वुइल्यम् जोन्स यांचा अभिप्राय आहे, (तसाच दुसऱ्या अनेक विद्वानांचाही आहे ), ती भाषा कुच्कामाची नाहीं असें मेकालेनीं ह्मटल्यावर, त्यांच्या शहाणपणाची व विद्वत्तेची अगदी कमालच झाली, असे म्हणावयाचें. आतां, हे दोन्ही अभिप्राय दोन पासंगांत घालून, त्यांची यथातथ्य