पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ भारतीय साम्राज्य. [ भाग कां त्यांच्या माथ्यांत वेड भरलें, हणजे पुष्टिकरणाची कारणें, व प्रतिपादन करण्याची साधनें, कितीही बालिश, पोरकट, नीरस, आणि निराधार असोत, ते कांही तरी एखादी गप्प ठोकण्याला, किंवा हवें तसें सैरावैरा भक- ण्याला, अथवा पांचटपणानें भलताच बादरायणसंबंध लावण्याला, कधींही मार्गे सरत नाहींत. अशा प्रकारचें निराधार प्रतिपादन, शोधकबुद्धीच्या पाश्चिमात्य पंडि- तानी करणें ह्मणजे, त्यासारखी खेददायक गोष्ट, दुसरी कोणतीच नाहीं. अशा दुराग्रही लोकांचा मिथ्यावाद केवळ निर्माल्यतुल्यच असल्यामुळे, त्यापासून आपल्या हृद- यावर यत्किंचितही संस्कार होऊं देऊं नयेत; किंवा आपलें मन कोणत्याही प्रकारें दूषित विचारांत निमग्न राहूं नये; आणि एतदर्थच प्रत्येक मनुष्याने चांगली खबर- दारी ठेविली पाहिजे. आतां, हा दुराग्रह व ही सत्यपराङ्मुखता, प्रसंग- विशेषीं किती उच्च कोटीप्रत जाते, हे या ठिकाणी मासल्याकरतां दाख- विणें जरूर आहे. युरोपांतील चां- गल्या पुस्तकालयाच्या एका कपाटांतीलही पुस्तकां च्या पासंगास, हिंदुस्थानांतील संकृत काव्यकलाप आणि शास्त्रसमूह, अथवा आरबी विद्याभांडार, लागणार नाही. किंवा युरोपियन राष्ट्रांच्या एकंदर संस्कृतांविषयों अ विचारी पाश्चिमात्या- चं मत.