पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगें. 66 असें म्हटले आहे की, “ ऋतूंसाठी चंद्र निर्माण केला, " व 'ऋतूंचे नियमन होण्यासाठींच चंद्र हा पुनः पुनः उगवतो. " प्रात्यहिक पंचमहायज्ञ, सायंप्रातरग्निहोत्र, दर्शपूर्णमा- सयज्ञ, चातुर्मासयज्ञ, व अयनयज्ञ, असे नानाप्रकारचे यज्ञ योग्यकाळी त्यांस करावे लागत. मिळून एतावता, चंद्राशी त्यांच्या धर्मव्यवहाराचा निकट संबंध असल्या- मुळे, चंद्राचें परिवर्तन कसकसें होतें, व तो कोणतें नक्षत्र किती दिवस भोगतो, ह्याचें तत्व शोधकबुद्धीनें हुड- कून काढण्याची त्यांस मोठीच अवश्यकता होती. व त्या वेळच्या सामाजिक स्थितीच्या नूतनावस्थेत, यांपेक्षां जास्त सूक्ष्मावलोकन करून विशेष रीतीनें अन्वेक्षण कर ण्याला त्यांस दुसरे कांहींच साधन नव्हते. यामुळे, चान्द्रमानावरून ज्या आमच्या हिंदु लोकांनी आज सुमारें आठ हजार वर्षीमार्गे ज्योतिः शास्त्राची मूलतत्वें कोणा- १. ऋग्वेदांत चंद्रादि ग्रहगतीचा वारंवार उल्लेख येत असून, ह्या आमच्या आदिवेदालाच आठ दहा हजार वर्षे होऊन गेली आहेत. “ Thus the Rigveda, the most ancient work that exists in any language known at persent, must have been composed between 6000 B. C. and 4000 B. C. कांहीं यूरोपस्थ पंडित देखील आर्य ज्योतिःशास्त्राचे प्राचिनत्व क बूल करतात, आणि इ. स. पूर्वी तीन हजार वर्षापलीकडील का- ळांतही हिंदूंची त्यांत पुष्कळच प्रगति होती, अर्से ते लिहितात. पुढे चालू.