पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग कारण, एक तर बाबिलन् लोकांचें राशिचक्र सौरमानावर अवलंबून असे; व आमच्या आर्य लोकांचें चांद्रमा- नावर अवलंबून होतें. आणि दुसरे है की, बाबिलन् लेखांत अति सूक्ष्म रीतीनें वारंवार तपा- स केला, किंवा पुनः पुनः डोळ्यांत तेल घालून दीर्घ दृष्टीनें पाहिले तरी, बाबिलन् देशांत चान्द्रमान सुरू असल्याचें कोठेंही आढळून येत नाही. तिसरे कारण है की, वेदांतील रोजच्या यज्ञयागादि क्रिया चंद्रगतीवरच विशेष रीतीनें अवलंबून असल्यामुळे, त्या उपग्रहाविषयीं जास्त शोध करणे त्याकाळी आमच्या आर्य लोकांस अगदीं अगत्याचें होतें. व मास, पक्ष, तिथि, पौर्णिमा, आणि अमावास्या, ह्यांचें साहजिक रीतीनें ज्ञान होण्यास चंद्रा- शिवाय स्वल्प असे दुसरें साधनच नव्हते. त्या काली, यज्ञयागादि क्रियेचा चंद्राशीं इतका निकट संबंध असे की, ऋत्विज (ह्मणजे ऋतुमानाप्रमाणे यज्ञ करणारा ) असे साधारण नांवच हवन करणारास असे. एका ऋर्चेत खोटीही ठरते. हिंदूंचे चांद्रमान, व बाबिलन् सौरमान. मागील पृष्ठावरून पुढे चालू, around ‘ every mount' and ' every grove ' and to whose other representative, the brazen calf ( nandi), the I5th of each month ( amavus ) was especially sacred." (Tod's Rajasthàn. Vol. I P. 519/520.)