पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग 66 बरीच शतकें अगोदर, चांगल्या रीतीनें कळली होती हैं निर्विवाद आहे. न्यायशास्त्रांत " गंधवती पृथ्वी, सानि- त्याअनित्याच, नित्या परमाणुरूपा, अनित्या कार्यरूपा, " अशी पृथिवीची व्याख्या दिली आहे. आणि ती परमाणु- रूप असून, सर्व परमाणुमात्राच्या ठायीं आकर्षणशक्ति असल्यामुळे तिच्यांतही आकर्षण आहे असे त्यांनीं यथान्याय ठरविलें. सूर्य फिरत नसून पृथिवी फिरते, व त्यामुळे सूर्यच फिरतो आहे असे वाटतें; तसेंच जितके गोल तितके सर्व फिरतात; इत्यादि शोध फार पुरातन काळीं लागले होते. इतकेंच नाहीं तर, त्या शोधांत एकामागून एक अशी नवीन भर पडतच चालली होती, आणि ते नवीन शोध शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, व कवि वगैरे लोक-समागास, चांगले माहीत होते. साधुवर्य ज्ञानेश्वर हा एके ठिकाणी असे लिहितो की:-- -- आणि उदो अस्ताचेनि प्रमाणें । जेसैं न चलतां सूर्याचें चालणें ॥ तैसे नैष्कर्म्य तत्व जाणें । कर्मचि असतां ॥ ( ज्ञा. अ. औं. ९९.) अथवा नावेहून रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें ॥