Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२वा ] ज्योतिःशास्त्र. याचा तात्पर्यार्थ इतकाच की, पृथिवीचा पिंड वाटोळा असून तो पंचमहाभूतात्मक आहे. तसेच तो चंद्रापासून जवळ असून, चंद्रापुढे बुध, शुक्र, व रवि, असे लागतात. शिवाय मंगळ, गुरु, शनि, आणि नक्षत्रादि वर्तुल गोल, यांनीं तो परिवेष्टित असून, तो कांहींएक आधाराशिवाय आपल्या आत्मशक्तीनें आकाशाच्या पो- कळींत, देव, दैत्य, मनुष्य, व राक्षस, इत्यादिसहित, नियमितपणानें राहिला आहे. पृथिवीची गोला- कृति. पृथिवीचें आकर्षण. आधार सांपडतो. w पृथिवीच्या आकर्षण शक्तीवि- षयीं ज्योतिषग्रंथांत एक उत्तम आकृष्टशक्तिश्च महीतयायत् खस्थं गुरुस्वाभिमुखं स्वशक्त्या । आकृष्यते तत्पततीवभाति समेसमंतात्क पतत्वियंरवे ॥ ★ ह्यावरून इतकें सिद्ध आहे कीं, पृथिवीच्या अंगीं आकर्षणशक्ति असल्यामुळे, ती आकाशांतील पदार्थास आपणाकडे ओढते; व त्यायोगानें ते पडतात असे दिसत. परंतु वास्तविक पाहतां तर्से नसून, ते आकर्षणशक्तीनें पृथिवीकडे आकर्षिले जातात. आणि ही गोष्ट आमच्या किंबहुना त्याही पलीकडे हिंदूंस सात आठशे वर्षांपूर्वी,