Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ भारतीय साम्राज्य. [ भाग वेले बनले, आणि त्यांनीं हिंदूंपासून ज्योतिर्विद्या प्राप्त करून घेतली, व ज्योतिःसिधान्ताचें आरबी भाषेंत सि- न्धेन्ध नामक भाषांतरही करविलें. पुढे नवव्या शतकांत ( ह्यणजे इ० स० ८९९ च्या सुमारास ) धाकटा भास्कर नामक ज्योतिषी प्रसिद्धीस आला. त्याने करणसार नां- बाचा ग्रंथ त्याच सुमारास लिहिला असल्याचें आल्बी- रूणीच्या लेखावरून समजतें. शिवाय त्यानें अहर्गण ना- मक ग्रंथ केला असल्याचेंही आल्बीरूणी लिहितो. त्यानं- तर केवळ सूर्योपमच जो प्रसिद्ध भास्कराचार्य, हा बारा- व्या शतकांत उदयास आला. ह्या भास्कराचें जन्म त्या- घ्याच स्वलिखिताप्रमाणे शके १०३६ ( इ० स० १११४) सालीं झाले असून, त्यानें केलेला सिद्धांतशिरोमणि शके १०७२ ( इ० स० १११०) साली पुरा झाला; आणि करणकुतूहल शके ११०५ ( इ० स० ११८३ ) सालीं पुरे झाले. सिद्धान्तशिरोमणीं- सिद्धान्तशिरोमणीत पृथिवी गोल असल्याविषयीं खाली लिहिलेले तील मूलतलें, प्रमाण सांपडतें. भूमेः पिंडः शशांकज्ञकविरविकुजेज्यार्किनक्षत्रकक्षा बृत्तैर्वृत्तोवृतः सन्मृदनिल सलिलव्योम तेजोमयोयम् । नान्याधारः स्वशक्तयैव वियतिनियतं तिष्ठतीहास्यपृष्ठे निष्ठं विश्वंच शश्वत् सदनुजमनुजादित्य दैत्यं समंतात् ॥