भाग २३ वा. वैद्यशास्त्र. हिंदूंचे वैद्यक हे त्यांच्या स्वतंत्र परिश्रमाचें फल-- त्याचें पौरा- णत्व -- त्याचा विकासकाल-- हिंदु वैद्यकावरील अति प्राचीन ग्रंथ--ऋग्वेदांत त्याचें आदिकथन-- आयुर्वेदांत त्याचे विवेचन, व तत्संबंधी पौराणिक कथानक -- अग्निवेशतंत्र -- कायचिकित्सा व शल्यचिकित्सा --चरक व त्याचा काल – सुश्रुत व त्याचा काल-- -रसवैद्यक, व त्याची मूलतत्व- रसवैद्यकाचा काल – वाग्भट, व त्याचे ग्रंथ– अष्टांगहृदय- हिंदु वैद्यकाची पर्याप्ति — हिंदूंची वैद्यकीय शस्त्रे – वाग्भटाचा काल, व तदनंतरचे वैद्यकावरील ग्रंथकार – हिंदूवैद्यकापासून इतर राष्ट्रांस प्राप्ति – हिंदुवैद्यकाची चढती व उतरती कला-- वैद्यकांत, हिंदूंची क्षणोक्षणी इतरांस मदत -- आर्यवैद्यक, व त्याचा इतर राष्ट्रांवर अनुग्रह. भाग २४ वा. नीतिशास्त्र. संस्कृतांतील नीतिग्रंथ-कामन्दकीय नीतिशास्त्र – पंचतंत्र, हितोपदेश, व दुसरीं नीतिकाव्यें – भारतीयांचा कथामृतनिर्झर- पंचतंत्राची भाषांतरें – पल्हवीत, अरचीत, इराणींत, फ्रेंच भाषेत, इंग्रजीत, व तुर्कीत - प्राचीचें पाश्चात्यांस ऋण – प्राच्य कथांचें पौराणत्व – प्राच्य कथापर्यटन – आशिया खंडांत, यूरोप- खंडांत, आणि अमेरिकेत -- ग्रीक गंधाविषयीं मिथ्या व निर्मूलक- कल्पना--पंचतंत्रांतील नीतितत्वांची कीर्ति-हिंदुधर्मातील नीति- शास्त्राची मूलतत्वें-- त्यावर परधर्मीयांचे हल्ले परिणाम,
पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/९
Appearance