या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
भाग २५ वा. आर्यकला. आर्यकला- त्यांतील विषय- धनुर्वेद, व तत्संबंधी ग्रंथ - युद्धकलेचें शास्त्रीय विवेचन. भाग २६ वा. गायनकला. गायनकला व तिचें मोहकत्व – आर्यसंगीताचें प्राचीनत्व- हिंदुसंगीताचा पौराणिक, व ऐतिहासिक काल - हिंदुसंगीताची चढती, व उतरती कळा - गायनाचे प्रकार, व सूर संगीताची अंगे – वादनकला–नाट्यकला ताल गायनकलेत हिंदूचे इतर राष्ट्रांनी केलेले अनुकरण - गायनकलेतील ग्रंथकार-गा- यनकलेची अभिवृद्धि, व तिचा न्हास - हिंदु राग - गायनकले - ची सांप्रतची स्थिति — तत्संबंधी पाश्चिमात्यांचे अज्ञान, व तज्जन्य अवहेलना. भाग २७वा. अर्थशास्त्र. अर्थशास्त्र, व त्यांतील विषय-चित्रकला व तिचे प्राचीनत्व - हिंदुचित्रकलेंतील उणीव - पाणिनी व अशोक, यांच्या वेळची चि- त्रकलेची स्थिति — हिंदु गृहांतील चित्रनिर्मिति