भारतीय साम्राज्य. [ भाग धान, स्त्रीपुरुषधर्म, विभागधर्म, द्यूतकंटक शोधन, वैश्य- शूद्रोपचार, संकीर्णसंभव, आपद्धर्म, वर्णप्रायश्चित्तविधि, संसारगमन, त्रिविध कर्माच्या गुणदोषांचें परीक्षण, देश- धर्म, जातिधर्म, कुलधर्म, आणि पाषण्डगणधर्म, याविषयीं सविस्तर वर्णन मोठ्या मार्मिकपणानें केले आहे. पहिल्या आध्यायाच्या ८८ व्या श्लोकांत ब्राह्मणांचे कर्तव्यकर्म सांगितलें असून, त्यांत, अध्यापन ब्राह्मणांचं कर्तव्य- आणि अध्ययन यांची योजना शि- कर्म. रोभागी केली आहे. त्यावरून विद्या- दान व विद्यार्जन करण्याच्या कामी, ब्राम्हण हे पूर्वीच्या काळ अति निपुण होते. इतकेंच नाहीं तर, त्यांची त्या कामी असलेली ख्याति आजमितिसही जशीच्या तशीच कायम आहे. वाराणशीं सारख्या मोठमोठ्या क्षेत्रांत, आणि पुण्यपत्तनासारख्या विस्तीर्ण शहरांत, तसेंच ब्राम्हण वस्तीच्या लहान लहान गांवांत, अजूनही वैदिक विद्वज्जन आपल्या छात्रवर्गास वेदाध्यापन करीत अस ल्याचें हम्मेश दिसून येतें. परोपकार व देशसमृद्धि यां साठी विद्यादान, आणि ज्ञान व आत्मोन्नति यासाठीं विद्यार्जन, हे जणुकाय ब्राम्हणांचें ब्रीदच असून, तें त्यांच्या पिण्डांतच खिळल्यासारखे दिसतें. अशा प्रका रची त्यांस विद्येची अनुपम गोडी होती, म्हणूनच ते इतक्या योग्यतेस चढले, आणि आपला पुराण देश एवढ्या
पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/२५
Appearance