Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. धर्मशास्त्र. सृष्टिरचना. कांहीं तमोमय होतें. तथापि स्वयंभू असा जो भगवान् तो तदन्तर्गतच असून, त्या प्रलयकालच्या अवस्थेत अगदर्दी प्रसुप्त होता. अशा वेळीं, तो अहंकारामुळे एकाएकी प्रबुद्ध होऊन, त्यानें ही अखिल चराचर सृष्टि, नानाविध प्रजा, आणि जारज, अण्डज, व स्वेदज, वगैरे कोटींतील असंख्य प्राणी निर्माण केले. पुढें मनुष्यमात्राच्या सामाजिक स्थितीची व्यवस्था लावण्यासाठी, त्यांचे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, आणि शूद्र, असे चार भेद कल्पून, त्या प्रत्येकांची पृथक् पृथक् कर्मे, व विहिताचरण, हीं त्यांच्या मार्गे लावून दिली. अशा प्रकारें ही हिंदुसमाजस्थिति उदयास आली, अर्से ऋग्वे - दावलोकनानें व मनुस्मतीवरून चांगले लक्षांत येतें. २०वा ] पर्यंत, मनुस्मृतीचें समग्र अवलोकन केले ह्मणजे अर्से सहज लक्षांत येईल की, मनुष्याच्या उत्पत्ती- पासून, किंबहुना या जगाच्या उ त्पत्तीपासून, तों तहत् त्याच्या अन्ता- मनुष्यमात्राच्या इतिकर्तव्यतेचें त्यांत साद्यन्त विवेचन केले आहे. ह्मणजे जगदुत्पत्ति, नृदेह संस्कारविधि, व्रतचर्योपचार, स्नानविधि, दाराधिगमन, विवाहलक्षण, महायज्ञविधान, श्राद्धकल्प, वृत्तिलक्षण, स्नातकव्रत, भ- क्ष्याभक्ष्य व शौचविचार, द्रव्यशुद्धि, स्त्रीधर्मयोग; तसेंच तापस्य, मोक्ष, व संन्यास लक्षण, राजधर्म, साक्षिप्रश्नवि- ममुस्मृतीतील सारांश.