Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०वा ] धर्मशास्त्र. १३ विद्यार्जना- मोठया वैभवास आणिला. बाल्यावस्थेपासून तो युवास्थेपर्यंत, आणि युवावस्थेपासून तो वृद्धावस्थेपर्यंत चीच उत्कट इच्छा असल्यामुळे, ते आपले सर्व आयुष्य त्यांतच घालवीत, व विद्यामृत सेवनानें सदैव आनंदांत कालक्रमणा करीत. खरोखर, ह्या जगांत विद्येसारखी दुसरी कोणतीही कर्मणूक नाहीं. आणि ज्याने कां एकदां विद्यामृ- ताची चव घेतली आहे, त्याला ह्मणून दुसरा कोणताही विषय गोड लागणार नाहीं. रात्रंदिवस वेदपठण, व्याक- रणशास्त्राध्ययन, न्यायशास्त्रमीमांसा, ज्योतिः शास्त्रान्वेषण, आयुर्वेदनिरूपण, साहित्यशास्त्रविवेचन, आणि नानावि- धकलाकलाप वर्णन, यांतच त्यांचें सर्व आयुष्य खर्च होई. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला ह्मणजे आमचे पूर्वीचे व्रा- म्हण किती उत्साही, किती उद्योगी, आणि किती वि द्वान् होते, याचे चांगलें दिग्दर्शन झाल्याशिवाय खचित राहणार नाहीं. वेदपठण. आतां " राजा कालस्य कारगम् " ही ह्मण जरी सर्वांशीं खरी आहे, आणि आजकाल इंग्रजी राज्यसत्ता बहुतेक सर्वत्र अ सल्यामुळे इंग्रजीभाषा जरी सर्व ठिकाणी चालू आहे, तरी देखील या अतिपुराण भरतखंडांत, आजमितीसही वेद- मंत्रपठणाचा ध्वनि, आणि शास्त्राध्ययनाचा घोष, हे कर्णरन्ध्रात ठिकठिकाणीं यथेष्ट दुमदुमून मनास अत्यानंद २