पान:भारतीय लोकसत्ता.pdf/९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८९
भौतिक अधिष्ठान

अधोगामी झाले आहे ही कल्पना नष्ट करून टाकली पाहिजे. आपल्या श्रेष्ठत्वाचा अभिमान आपण धरिला पाहिजे; हे सर्व ठीक आहे. पण आतां मला थोडें कटु सत्य सांगावयाचे आहे. त्यावरून आपण रुष्ट होणार नाहीं अशी आशा आहे.' अशी प्रस्तावना करून स्वामीजींनी गेल्या हजार वर्षाच्या आपल्या हीनदीन स्थितीचें, आपल्या अधःपाताचे चित्र श्रोत्यांच्या समोर उभ केले व त्या अधःपाताला आपले आपणच सर्वस्वी कारण आहों असें त्यांना बजावलें. यापुढे स्वामीजींचा सूर अगदींच पालटला. आमच्यावर मुसलमानांचे आक्रमण झाले, ख्रिस्त्यांचे झाले. आमच्यापैकी कोट्यवधि लोक धर्मच्युत झाले. पण त्यांनीं न व्हावे अशी कोणची व्यवस्था आम्हीं केली होती ? जे भिकारी होते, हीनदीन दरिद्री होते, त्यांना आम्ही थोडें सुख देण्याऐवजीं निवृत्तीचे धडे देत बसलो. आमच्या पंडितांनी सगळा धर्म सोवळ्याओवळ्यांत आणून ठेवला आणि ऐहिक वैभवाकडे दुर्लक्ष केले त्याचे हे परिणाम आहेत. (पृ. १४९). आपण अध्यात्माचा अतिरेक कला आहे, तेव्हां आतां आपला उद्धार होण्यास भौतिकवादाचा आश्रय करणे अवश्य आहे. एका दृष्टीने येथे भौतिकवाद आला आहे, तो आपल्या उद्धारार्थच आला आहे. त्याच्यामुळे जन्मनिष्ठ उच्चनीचता नष्ट होईल, बुद्धिप्रामाण्य निर्माण होऊन धर्मग्रंथांची ठेव सर्वांच्या हाती येईल व सुखी जीवनाचे दरवाजे सर्वांना खुले होतील. पश्चिम ही धनिकांच्या टांचेखालीं चेंगरली असली तर पूर्व ही धर्ममार्तंडांच्या टांचेखाली चिरडली आहे हें ध्यानांत ठेवा. आतां एकीनें दुसरीवर नियंत्रण ठेवून समतोल राखिला पाहिजे. केवळ अध्यात्मानें जगाची प्रगति होणार नाहीं.' (पृ. १५७)

प्रछन्न भौतिकवाद

 स्वामीजींनी किती धोरणानें व चतुराईने आपल्या संदेशाचा प्रसार चालविला होता, तें यावरून ध्यानांत येईल. ते स्वतः भौतिकवादी कधींच झाले नाहींत. पण भौतिकवादाचा आश्रय केल्यावांचून आपला उद्धार होणार नाहीं, ही त्यांची खात्री झाली होती. पण त्याचें प्रतिपादन कांहीं एका पद्धतीने झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. सुधारकांवर ते तुटून