पान:भारतीय लोकसत्ता.pdf/८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८४
भारतीय लोकसत्ता

अंगीकार केला पाहिजे, पाश्चात्यांचे शिष्यत्व पत्करिलें पाहिजे' असे ते निःसंदिग्धपणे प्रतिपादीत असत. तसले ते तत्त्वज्ञान व त्याचे असले प्रतिपादन त्या काळी समाजाला रुचणें व पचणें शक्य नव्हते; त्यामुळे त्याच्याविरुद्ध त्या वेळीं प्रतिक्रियेची एक प्रचंड लाट उसळली. ती लाट एवढी जबरदस्त प्रभावी होती कीं, आजहि आपण धर्मनिरपेक्ष समाजाच्या गोष्टी बोलत असलो तरी, आणि जीवनाच्या प्रत्येक अंगोपांगांत पाश्चात्यांचे अनुकरण करीत असलो तरी तात्विकरीत्या तसें कबूल करणे आपणांस जड जातें आणि त्या लाटेची शीग होती त्यावेळी जी भाषा आपण बोलत होतो तीच भाषा आज ती शीग व लाटहि ओसरून गेली आहे तरी आपण कायम ठेवली आहे. म्हणून या प्रतिक्रियेची मीमांसा करणे अवश्य आहे.
 व्यक्तिस्वातंत्र्य, विवेकनिष्ठा, आमूलाग्र परिवर्तन, क्रांतिप्रवृत्ति, गतिशीलता इ. भौतिकवादांतील जी तत्त्वें त्याविरुद्ध त्या काळीं भरतभूमीच्या सर्वच प्रांतांत जोराची प्रतिक्रिया सुरू झाली होती. पंजाबांत स्वामी दयानंदांनी स्थापलेला आर्यसमाज भौतिकवादाचा कट्टा विरोधक होता. मद्रास मध्यें अड्यारला स्थापन झालेला जो थिऑसफीचा पंथ त्यानें तर पाश्चात्य तत्त्वज्ञानाविरुद्ध मोहीमच काढली होती. महाराष्ट्रांतहि आगरकरांच्या तत्त्वज्ञानाला कसून विरोध होत होता; पण या लाटेला ने खरें उधान आले स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील जगद्धर्मपरिषदेत जें अलौकिक यश मिळविले त्यामुळे या विवेकानंदप्रणीत प्रतिक्रियेविषयीं आपणांस जरा जास्त चिकित्सेने विचार करणे अवश्य आहे. त्यावांचून आगरकरांचे तत्त्वज्ञान व भौतिकवाद यांचे खरें महत्त्व व खरी आवश्यकता आपल्या ध्यानीं येणार नाहीं.
 भौतिकवादाविरुद्ध जी प्रतिक्रिया झाली ती आज जरी आपणांस अप्रिय वाटत असली, ती प्रतिक्रिया मारून काढून भौतिकवादाचाच आपण आज आश्रय केला पाहिजे गें जरी खरे असले तरी त्या काळीं ती प्रतिक्रिया होणे आपल्या देशाच्या उन्नतीच्या दृष्टीने फार अवश्य होते हा विचार आपण कधींही दृष्टिआड हाऊं देऊं नये. प्रतिक्रिया अवश्य होती असेन म्हणण्याचे कारण हें कीं, त्या वेळीं आपला समाज राष्ट्रीय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत पराभूत झाला होता. राजकीय दृष्टीनें तर आपण निश्चेष्ट झालच होतों; पण