पान:भारतीय लोकसत्ता.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७
भौतिक अधिष्ठान

अद्याप यावयाची आहे' हे मत 'आमचे काय होणार' या निबंधांत त्यांनी सांगितले आहे आणि त्याचे विशेष विवेचन 'मनुष्यजातीची पूर्णावस्था' या निबंधांत केलें आहे. (केसरीतील निबंध पुस्तक २ रें. पृ. ८१). ते म्हणतात, "ज्यांची जातिभेदावर श्रद्धा आहे त्यांच्या मतें मानवाच्या पूर्णावस्थेचा काळ मागेंच होऊन गेला असून आतां समानतेकडे मानवाचा कल होत असल्यामुळे दिवसेंदिवस मनुष्यजाति भ्रंश पावत आहे; पण जेथें मनुष्यास जन्मतः सर्वामध्ये साम्य आहे असे वाटत असतें तेथें याहून भिन्न स्थिति असते. तेथे कोणासहि आपण आहों तीच पूर्णावस्था आहे असे भासत नाहीं. आपल्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यास जागा आहे असे प्रत्येकास वाटते व त्यास ती करण्यास पुष्कळ उमेद असते. युरोपीय समाजांत ही समजूत दृढ होत आहे. या समजुतीनेच त्यांचे सुधारणेकडे सदोदीत प्रयत्न चालले आहेत. या समजुतीने युरोपीय लोकांत किती परिश्रम, किती उद्योग, किती धाडस व किती घडामोड सुरू आहे, याची आमच्याने कल्पनाहि करवत नाहीं." (उक्तग्रंथ पृ. ८८)
 आपला प्राचीन व मध्ययुगीन इतिहास पाहिला तर प्रगति तत्त्वावर व मानवाचें पूर्णत्व पुढे आहे या तत्त्वावर समाजाची श्रद्धा असण्याचे महत्त्व किती आहे ते कळून येईल. आपली आजची कलियुगाची घातकी कल्पना महाभारतकाळीं या स्वरूपांत नव्हती. निदान कालगतविषय तिच्या अगदीं उलट अशीहि एक कल्पना त्या काळीं मान्य झाली होती. सत्य, त्रेता, कलि इ. युगें हीं कालक्रमाने येत नसून तीं राजाच्या कर्तृत्वावर अवलंबून असतात असे महाभारतांत पितामहांनीं सांगितले आहे. राजा नेव्हां आपल्या पराक्रमानें देशांत शांतता प्रस्थापून प्रजेचा उत्कर्ष घडवितो तेव्हां सत्ययुग अवतरते— दण्डनीत्यां यदा राजा सम्यक् कार्त्स्न्येन वर्तते । तदा कृतयुगं नाम कालसृष्टं प्रवर्तते ॥ (शांति पर्व ६९।८०)- आणि राजा दुष्ट किंवा दुबळा असला व त्यामुळे सर्वत्र अराजक माजलें कीं कलियुग मानतें, असा अगदी पुरोगामी विचार त्या वेळी सांगितला गेला होता. आपला प्राचीन इतिहास अत्यंत वैभवशाली व उज्ज्वल असा होता याचीं जीं अनेक कारणे आहेत त्यांतील मानवाच्या पूर्णत्वासंबंधींचे हे तत्त्वज्ञान हें एक निश्चितच कारण आहे. मागें पूर्णावस्था होऊन गेली व आतां दिवसेंदिवस ऱ्हास होत