पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४२३
मानवपुनर्घटना

झालेला नाहीं. आणि तो निर्माण करण्याची आपल्या ठायीं पात्रता आहे असे दिसत नाहीं. दोनशे पानांच्या पुस्तकांत डॉ. ग्यानचंद यांनीं निदान पन्नास वेळां तरी हे सांगितले असेल.
 या योजनेंतील दुसरा दोष असा की तिच्या पुढे निश्चित हेतु व साध्य असे रेखलेले मुळींच नव्हते. प्रत्येक प्रांतांत लक्षावधि किलोवॅट वीज निर्माण करण्याच्या योजना आंखल्या आहेत, कांहीं चालू झाल्या आहेत; पण या निर्माण होणाऱ्या विजेचा वापर कसा करावयाचा हें अजून कांहींच ठरलेलें नाही. याचा व्हावा तितका विचारच झालेला नाहीं. आणि ग्यानचंद म्हणतात कीं, असें आहे तोपर्यंत हा खर्च समर्थनीय आहे असे म्हणतां येत नाहीं. (उक्तग्रंथ पृ. १६९) अंतिम हेतूचा व व्यापक दर्शनाचा अभाव असल्यामुळे कोणच्या कार्याला अग्रमान द्यावा व कोणचें पुढे ढकलावे याचें ताळतंत्र रहात नाहीं. डॉ. ग्यानचंद यांच्या म्हणण्याचें प्रत्यंतर मुंबई व मद्रास या प्रांतांत दिसून येतें. हे दोन्ही प्रांत अन्नधान्याच्या बाबतींत तुटीचे आहेत आणि नेमक्या याच प्रांतांनीं दारुबंदी करून आपले २०/२५ कोटींचे उत्पन्न घालविले आहे. आसामचे उदाहरण असेंच आहे. या प्रांतांत भूमीच्या कुशींत सुप्त धन अगणित आहे. आणि तज्ज्ञांच्या मतें, या धनाच्या निर्मितीवर जितका खर्च करावा तितका फलदायी होईल. पण विकसनांत या प्रांताला २२९ कोटीपैकी फक्त ६ कोटी मिळाले आहेत. आणि येथल्या खनिज संपत्तीला अजून स्पर्शहि झालेला नाहीं. इतकेच नव्हे तर ती खणून वर काढण्याची योजनाहि आखलेली नाहीं. सर्व मिळून अंतीं काय साधावयाचें आहे किंवा एखाद्या विशिष्ट योजनेने अंती काय प्राप्त करून घ्यावयाचे आहे हेहि ठरले नसेल तर आंखलेल्या योजना किती फलदायी होतील हे दिसतेंच आहे !
 या पुस्तकांत भिन्नभिन्न ठिकाणीं डॉक्टर ग्यानचंद यांनी जे शेरे दिले आहेत ते एकत्र केले तर आपल्या १९४६ ते ५० या पंचवार्षिक योजनेचें रूप पुढीलप्रमाणे दिसेल. या योजना प्रत्यक्षांत आणणाऱ्या अधिकाऱ्यांत दृढनिश्चय नाहीं, स्वयंप्रेरणा नाहीं व तळमळ नाहीं. (पृ. ४२, ७९) सामग्ऱ्याने अवलोकन करून योजना आंखावी, प्रत्येक