पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१४
भारतीय लोकसत्ता

समाजांत निर्माण व्हावी असे वाटत असेल, तर त्यांनीं वर निर्दिष्ट केलेल्या मन्वंतरांतून आपल्या बांधवांना नेण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. या कार्यात यश आले तर त्यांनाच येईल, इतर समाजांतल्या नेत्यांचा येथे कांहीं उपयोग नाहीं. म्हणून, भरतभूमि हीच आपली मातृभूमि अशी त्यांची खरोखरच कृतबुद्धि असेल तर त्यांनीं 'मातृभूमीची निष्ठा' या शब्दांत समाविष्ट असलेल्या सर्व भावना मुसलमान समाजांत निर्माण करण्याची कसोशी केली पाहिजे.
 मुसलमान समाजांत धर्मातीत राष्ट्रीय दृष्टि निर्माण करण्याच्या या प्रयत्नांत यश कितपत येईल हे सांगता येत नाहीं. आज तर मनाला निराशाच वाटत आहे. संधि सांपडेल तेव्हां जबाबदारीच्या अधिकारावरचे मुस्लीम लोकहि येथले कागदपत्र घेऊन पाकिस्तानांत पळून जात आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवालाहि कोठें विरोध होत आहे. मुस्लीम लीगच्या पुनरुद्धाराचे प्रयत्न कोठे चालू झाले आहेत. मशिदीची सबब पुढे काढून हिंदूंच्या मिरवणुकीवर मुसलमान पूर्वीप्रमाणेच हल्ले करीत आहेत. पाकिस्तानचें निशाणहि हिंदुस्थानांत उभारण्याचे कोठें कोठें प्रयत्न होत आहेत. आणि सर्वात भयंकर म्हणजे श्रीशिवछत्रपतींची अत्यंत निरर्गल अशी निंदा महाराष्ट्रांतहि कांहीं मुसलमान करीत आहेत. हे चालू आहे तोपर्यंत या दोन समाजांची संघटना होणे अशक्य आहे.
 तथापि अशाहि स्थितींत क्वचित् कोठें आशेचे किरण दिसत असल्याचा भास एकादे वेळीं होतो. काश्मीरप्रकरण हें अशापैकींच एक आहे, असे केव्हां केव्हां वाटतें. काश्मिरी मुसलमानांना पाकिस्तानांत जावयाचेंच असते तर त्यांना कोणी अडवूं शकला असता, असें वाटत नाहीं. असे असूनहि दृढनिश्चयाने भारतांतच रहावयाचें, असें तेथील नेत्यांनी व जनतेनें ठरविले आहे. तेथील नेते मधूनमधून कांहीं भाषणे अशीं करतात की, त्यांच्या भारतनिष्ठेविषयी व राष्ट्रीयतेविषयी शंका यावी. पण पुन्हां पुन्हां ते ती भाषणे रद्द करून भारतांत रहाण्याचा निश्चय प्रगट करतात. या सगळ्यावरून एक गोष्ट तरी निश्चित होते कीं, केवळ स्वधर्मीय ते आपले, अशी अंधनिष्ठा काश्मिरी मुसलमानांत नाहीं. अन्यधर्मीयांशीं राष्ट्रीय ऐक्यभावनेनें