पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१२
भारतीय लोकसत्ता

अनुभव जमेला धरून ही भूमि, येथली परंपरा येथले महापुरुष यांच्याबद्दल आपुलकी वाटल्यावांचून मुसलमानांशीं ऐक्य शक्य नाहीं हें काँग्रेसनेत्यांनी एकतर जाणलें नसावें किंवा जाणूनहि त्यांना बोलण्याचें धैर्य झाले नसावें. जाणले नसावे असे वाटत नाहीं. कारण रामाबरोबर रहीमाचा व कृष्णाबरोबर करीमाचा जयघोष करणे अवश्य आहे, यानेंच ऐक्य होणार आहे, हे काँग्रेसनेत्यांच्या ध्यानीं आले होते आणि तसा जप व जयघोष हिंदूंनीं सुरूहि केला होता. पण मुसलमानांनी रहिमाबरोबर रामाचा व करीमाबरोबर कृष्णाचा जप करणे अवश्य, असा त्यांना उपदेश यांनी कधी केला नाहीं. इतकेच नव्हे तर, ज्या सभेंत मुसलमान आहेत तेथें आपल्या परंपरेबद्दल आपणच मुग्ध रहावें, तिच्या अभिमानाचा उच्चार करूं नये, असे धोरणच काँग्रेसच्या नेत्यांनी स्वीकारले. तें कांहीं असो. एवढे खरें कीं पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा व सामाजिक क्रान्ति या मन्वंतरांतून मुसलमान समाज जाणें अवश्य आहे, त्यावांचून या भूमीबद्दल मुसलमानांना आपलेपणा वाटणे अशक्य आहे, महान् सत्य डोळ्यांपुढे ठेवून काँग्रेसने आपले घोरण आंखले नव्हते यांत शंका नाहीं.
 मार्क्सवादी लोकांना तर या मन्वंतरांचें मुळींच महत्त्व वाटत नाहीं. त्यांच्या अर्थवादी एकांतिक अंध दृष्टीमुळे, धर्मवेडाला स्वतंत्र अस्तित्व आहे हेच त्यांना मान्य नाहीं. धर्मनिष्ठा, शब्दप्रामाण्य, सामाजिक, उच्चनीचता हे सर्व धनवंतांनी धनहीनांना भरडून काढण्यासाठी निर्माण केलेले भ्रम आहेत, असाच त्यांचा सिद्धांत आहे. त्यामुळे वर्गविग्रहाची आग पेटवून दिली की हे भ्रम आपोआपच नष्ट होतील, अशी त्यांची कल्पना होती. पण जगांतल्या इतर देशांप्रमाणेच हिंदुस्थानांतहि धर्मवेड हा भ्रम ठरण्याऐवजी कम्युनिस्टांचे त्याविषयींचे सिद्धांत हाच भ्रम ठरला. मुंबई, कलकत्ता, नागपूर, कानपूर, इ. शहरी कामगारांच्या प्रचंड संघटना मार्क्सवादी लोकांनी उभारल्या होत्या. त्यांत मुस्लीम कामगारहि सामील झालेले होतेच. पण मार्क्सवादाच्या वीसपंचवीस वर्षांच्या शिकवणुकीनंतरहि, वर्गलढ्याचें तत्त्वज्ञान अहोरात्र कानावर पडत असतांहि, धर्माच्या तत्त्वावर हिंदुस्थानची फाळणी केली पाहिजे, असाच या पुरोगामी, क्रान्तीच्या आघाडीवर असलेल्या मुस्लीम कामगार वर्गाने निर्णय दिला. आणि हिंदु