पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४०७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०६
भारतीय लोकसत्ता

अनेक मार्गांनीं ती हिंसा करीत होती. पण उत्तरेंतील अनेक प्रांतांत अनेक शहरी मुसलमानांची आक्रमणे नित्याची होऊन बसल्यावरहि हिंदूंना आत्मरक्षणासाठी तरी संघटित करावें हा विचार तिने मनात येऊ दिला नाहीं. कारण त्यामुळे हिंसा घडण्याचा संभव होता. आणि 'काँग्रेस हिंदूंची जपणूक करते' असा आरोप येण्याची शक्यता होती. हिंदूंची कत्तल झाल्याने हिंदुपक्षपातित्वाचा आरोप काँग्रेसवर येण्याचा मुळींच संभव नव्हता. पण मुस्लीम आक्रमणापासून आत्मरक्षण करण्यासाठीं संघटना केल्याने तो आला असता. म्हणून काँग्रेसने आपली शुद्ध भूमिका राखण्यासाठी पहिली गोष्ट डोळ्यांआड केली. वास्तविक काँग्रेसनें हिंदु व मुसलमान या दोन्ही धर्माच्या तरुणांची एकत्र संघटना करण्यास हरकत नव्हती. पण मुसलमानी आक्रमणाविरुद्ध उभारलेल्या संघटनेत मुसलमान तरुण येणार नाहीत, ही काँग्रेसची खात्री होती. आणि नुसत्या हिंदूंची संघटना ही जातीय ठरते, नुसत्या हिंदूंची कत्तल ही तशी ठरत नाहीं, असा पोक्त विचार करून काँग्रेसने कोणच्याहि प्रकारच्या संघटनेचा केव्हांहि विचार केला नाहीं. शेवटी काँग्रेसला पाकिस्तान द्यावे लागले याचे कारण असे सांगण्यांत येतें कीं, १९४६ च्या निवडणुकीत लीगला प्रचंड बहुमताने निवडून देऊन अखिल मुस्लीम समाज तिच्यामागे उभा राहिला आणि काँग्रेस ही स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाला बांधलेली होती. पण हे कारण अगदी हास्यास्पद आहे. कारण पाकिस्तानामुळे मुसलमानांचा प्रश्न मुळींच सुटत नव्हता व सुटलाहि नाहीं. -७/८ कोटी मुसलमानांपैकी निम्म्याच्यावर मुसलमान अजून हिंदुस्थानांतच आहेत. आणि जे १/२ कोटी हिंदु पाकिस्तानांत आहेत त्यांच्याहि स्वयंनिर्णयाचा विचार काँग्रेसने करावयास हवा होता. पाकिस्तानांत राहिलेल्या हिंदूचे पुढे काय होईल याची कल्पना काँग्रेसला नसेल असेहि म्हणणे शक्य नाहीं. असे असूनहि काँग्रेसनें पाकिस्तानाला मान्यता दिली, याचें खरें कारण म्हणजे मुस्लिमांनी केलेली 'डायरेक्ट ॲक्शनची' उठावणी हे होय. १५ ऑगस्ट १९४७ च्या आधी वर्षभर मुसलमानांनी जाळपोळ, विध्वंस, कत्तली करून सर्वत्र नोआखलीचे वातावरण निर्माण केले होते. यावेळी या अत्याचाराला तोंड देऊन आत्मरक्षण करण्याइतकी संघटना काँग्रेसनें