पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३९३
सामाजिक पुनर्घटना- अस्पृश्य व आदिवासी

घोर अन्याय असून तो हिंदुधर्मायर कलंक होय याविषयींहि दुमत नाहीं. अशी वस्तुस्थिति असल्यामुळे अस्पृश्यांनी स्पृश्यहिंदूवर कितीहि भयंकर टीका केली तरी ती त्यांनी सोसली पाहिजे, असेच माझं मत आहे. पण या तऱ्हेची स्पृश्यांवर जहरी टीका केल्यानंतर अस्पृश्यांनी स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे. आणि तोच प्रश्न आदिवासी जसजसे समंजस होतील तसतसा त्यांनीही आपल्या मनाला विचारला पाहिजे. तो प्रश्न असा- स्पृश्य हिंदूंनीं व त्यांतील श्रेष्ठवर्णीयांनी आपल्यावर जुलूम केला, आपल्याला खाली दडपले हे सर्व खरे असले तरी आपल्या दीन दशेचें, अधःपाताचें, नाशाचं खापर सर्वस्वी त्यांच्या माथ फोडून चालेल का? आपल्या अवनतीला आपण मुळींच जबाबदार नाहीं हे खरे आहे काय ? अशा तऱ्हेचे आत्मानिरीक्षण अस्पृश्य करीत नाहीत; पण ते करणें अवश्य आहे असे वाटते.
 माझे असे ठाम मत आहे कीं, कोणच्याहि समाजाच्या अधःपाताला, त्याच्या दुर्गतीला, पारतंत्र्याला त्याचे आक्रमक, त्याला निर्दाळणारे, त्याला पायदळी घालणारे हे जितके जवाबदार असतात तितकेच किंबहुना त्याहून कांहीं अंशी जास्त त्या समाजाचे लोक जबाबदार असतात. इंग्रजांच राज्य येथे झाल्यावर येथल्या नेत्यांनी हे इंग्रज आमच्या सर्व अवनतीस कारण आहेत असा पुकारा केला. आणि तें चाजवीहि होतें. पण त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या समाजावरहि कमालीचा भडिमार केला. आणि आपल्या आजच्या स्थितीला वास्तविक आपणच जबाबदार आहों हा विचार अहोरात्र त्याच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. लोकहितवादी, विष्णुशास्त्री, टिळक, आगरकर, महात्माजी यांचे लेख वरवर चाळले तरी हे दिसून येईल. मागल्या इतिहासाची चिकित्सा करणाऱ्या अस्पृश्यांनी ही कठोर आत्मनिरीक्षणाची भूमिका घेतली नाहीं तर, आपल्या अधःपाताला दुसरे लोकच सर्वस्वी कारण झाले, हा दुबळा विचार त्यांच्या उन्नतीच्या आड आल्याखेरीज रहाणार नाहीं. गोंड, कोरकू, कानवर अशा जाती मुळांत अगदीं वन्य असतांना त्यांनी आणि संताळ, नाग यांनींहि या भूमींत आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत खूपच उंच स्थान मिळविलें. जेथे लढे करावे लागले तेथें तेहि त्यांनी केले. पण खरे म्हणजे या तऱ्हेच्या