पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४९
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

राहिले तरी भयंकर नुकसान होईल असें नाहीं. (पृ. २) काँग्रेस ही एक क्षत्रिय झुंजार वृत्तीची संस्था आहे. पण तिच्यावर ब्राह्मणी वर्चस्व आहे. जुन्या काळीं ज्याप्रमाणे मराठे, रजपूत, इतर क्षत्रिय यांचा उपयोग ब्राह्मणांनी केला, तसाच आतांही काँग्रेसचा उपयोग केला जाईल. (मीनेस ऑफ हिंदु इंपिरियालिझम पृ. ३०५ प्रकरण २३) [याचा अर्थ असा की स्वामीजींच्या मतें महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, राजेंद्रबाबू, अबुलकलम आझाद हेहि भोळे, अज्ञ, परप्रत्ययनेय असे असून ब्राह्मण सूत्रे हलवितील तसे नाचणारे आहेत.] ब्राम्हणेतरांतील अग्रेसर असे जे क्षत्रिय-नायर व मराठे- त्यांनी या विचारसरणीचा अवलंब केल्यानंतर अस्पृश्यांनीं तसा केला असेल यांत कांहीं आश्चर्य नाहीं. मात्र त्यांची भीति केवळ ब्राह्मणी राज्याची नसून एकंदर सवर्णांच्या राज्याची आहे. ब्राह्मणच फक्त दुष्ट व जुलमी आणि बाकी शूद्र, अस्पृश्य यांसह सर्व ब्राह्मणेतर दलित, ही ब्राह्मणेतर धुरीणांची भूमिका अस्पृश्यांना मान्य नाहीं. त्यांच्या मते सगळाच सवर्ण समाज जुलमी आहे. शिवराम जानबा कांबळे हे अस्पृश्यामधले एक थोर पुढारी व कार्यकर्ते आहेत. महात्माजींनी १९३० साली कायदेभंगाची मोहीम सुरू केली. त्यावेळी कांबळे यांनी- 'हिंदी राष्ट्रीय क्रान्तिविरोधक पक्ष' या नांवाचा पक्ष महात्माजींच्या चळवळीस विरोध करण्यासाठी म्हणून प्रस्थापित केला होता. 'चातुर्वर्ण्यविध्वंसनाचें व अस्पृश्यता- निवारणाचे कार्य पूर्ण होईपर्यंत तरी हिंदुस्थानांत ब्रिटिश राजसत्तेची फार जरूर आहे असे या पक्षाचे मत आहे' असे पक्षस्थापनेचे कारण देऊन महात्मा गांधी व त्यांचे अनुयायी यांनी कायदेभंगाची चळवळ तहकूब करून हीं कार्यें हाती घ्यावीं, नाहींतर त्यांच्याविरुद्ध सत्याग्रहाची मोहीम करण्यांत येईल, असे कांबळे, घाटगे, पाताडे या पक्षप्रमुखांनी जाहीर केले होतें. (कांबळे यांचे चरित्र- नवलकर, शेवटचें पृष्ठ). डॉ. आंबेडकर यांनी 'व्हॉट काँग्रेस ॲंड गांधी हॅव् डन् टु दि अनटचेबलस्' या १९४५ च्या आपल्या पुस्तकांत ब्रिटिश राज्याविषयीं हेच विचार प्रगट केले आहेत. अस्पृश्यांनी काँग्रेसच्या लढ्यांत कर्धीहि भाग घेतला नाहीं, असें सांगून त्याचे कारण त्यांनी वरीलप्रमाणेच दिले आहे. 'अस्पृश्यांना अशी भीति वाटते की हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळतांच तेथे पुन्हां हिंदूच -(डॉ. आंबेडकर अस्पृश्यांना हिंदू मानीत नाहींत) म्हणजे सवर्ण हिंदूचे राज्य