यांनी न्यायमूर्ति मर्फी यांना पाचारण करून, आपल्या पक्षांतील घाण धुवून काढण्याची विनंति केली. आपले अधिकारी, आपले सल्लागार, वरिष्ठकनिष्ठ नोकर, अगदी जवळचे चिटणीस हे सर्व धनवश होऊन वाटेल तो काळा व्यवहार करीत आहेत आणि त्याला वेळींच आळा घातला नाहीं तर, आपला पक्ष छिन्नभिन्न होऊन जाईल, अशी भीति ट्रूमन यांना वाटूं लागली होती हें याचे कारण आहे. डेमोक्रॅटिक पक्ष असा रोगग्रस्त झाला आहे व त्याचे शुद्धीकरण करण्याचे घाटत होतें, या बातमीमुळे, अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष कांहीं निराळा आहे असे मानण्याचे मुळींच कारण नाहीं. त्याचे शरीर डेमोक्रॅटिक पक्षापेक्षांहि जास्त रोगग्रस्त आहे. अमेरिकेसारख्या जागृत देशांत आज दीडशे वर्षांच्या स्थिरशासनानंतरहि भांडवलदारवर्ग आपले प्रभुत्व पुन्हां पुन्हां प्रस्थापित करूं शकतो. हा विचार भारतीय जनतेनें सदैव डोळ्यापुढे ठेवून, हा संग्राम अत्यंत कठीण आहे, यांत एखादा पक्ष घसरला तर लगेच त्याच्यावर गहजब करणे अत्यंत अविवेकीपणाचे होईल, हे ध्यानांत घेतले पाहिजे.
चीनची कथा
अमेरिकेची गोष्ट वर सांगितली. रशिया व चीन येथील सुरस व अद्भूत कथा सांगून काँग्रेस सरकारची तेथील सत्ताधाऱ्यांशी तुलना करण्याची सध्यां चाल पडत आहे. रशियानें भांडवलदार व जमीनदार नष्ट केले. पण त्यासाठी केवढी घोर हत्या त्याने केली! आणि एवढेहि करून फळ काय? तर पूर्वीपेक्षांहि तेथला समाज ध्रुवभिन्न झाला. तेथील सत्ताधारी हे पूर्वीच्या भांडवलदारापेक्षा जास्त निर्घृण, जास्त उन्मत्त, जास्त समर्थ व लक्ष पटीने जास्त स्वार्थलोलुप झाले आणि जगांत आजपर्यंत फक्त पशूंच्याच वांट्याला येणारे– गुलामांच्याहि नव्हे-केवळ पशूंच्याच वांट्याला येणारे मजूरवाडे दोन कोटी लोकांच्या नशिबी आले! चीनचें उदाहरण उत्तेजक आहे. पण अजून तेथे औद्योगीकरण व्हावयाचे आहे. भांडवल जमावयाचे आहे आणि मुख्य म्हणजे काळाच्या अत्यंत कठोर परीक्षेला माओच्या पक्षाला बसावयाचे आहे. या परीक्षेच्या तयारीत तो आहे तोंच तेथून परवां एक चमत्कारिक वृत्त आलें आहे ते सांगतों. चीनच्या कम्युनिस्ट पक्षांतील उत्तर-
पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३२१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२०
भारतीय लोकसत्ता