पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१२
भारतीय लोकसत्ता

कोटी रुपये काळ्या बाजारानें मिळविलेले आहेत. तसें छपविलेले उत्पन्न आजच्या (अहवालाच्या) घटकेला २५० कोटी रुपयांपर्यंत असावें. गेल्या दोनतीन वर्षांत धनिकवर्गाचें लक्ष्मीच्या दुहेरी उपासनेचे धोरण मुळींच बदललेले नसून जास्तच दृढ झाले आहे हे सांगावयास नकोच.

औषध की विष ?

 कारखानदार व व्यापारी यांची आणखी एक कहाणी सांगत. ती वाचल्यावर आपण कटु, कटुतर व कटुतम अशा कहाण्या ऐकत चाललों आहोत हें ध्यानांत येऊन आपल्या समाजाचा आर्थिक पाया कसा ढांसळत आहे व तो सांवरून तेथे समभूमि निर्माण करणे किती कठीण आहे, हे ध्यानांत येईल. ही तिसरी कहाणी औषधाच्या धंद्याविषयीं आहे. आणि म्हणूनच ती कटुतम आहे. साखर मिळाली नाहीं तर प्राण जात नाहीं. कापड मिळाले नाही तर तो जाईल, पण त्यांवर कांहीं उपाय निघतो; पण पेनिसिलीन किंवा स्ट्रेप्टोमायसीन या औषधाच्या ऐवज फसगतीने दुसरींच औषधें अंगांत टोचली गेली तर ! जनतेची अशी फसगत करण्याचा उद्योग या देशांत सध्यां फार मोठ्या प्रमाणांत चालू आहे. औषध तयार झाल्यावर त्याची गुणावहता तपासणे व त्याला मंजुरी देणें हें काम मुंबईच्या हाफ्किन्स इन्स्टिट्यूटचें आहे. तेथील अधिकाऱ्यांनी आपल्या इतिवृत्तांत पुढील माहिती दिली आहे. १९४९ साली ३४० औषधे तपासली. त्यांतील १३८ म्हणजे शे. ४९ औषधें हीन प्रतीचीं व भेसळीचीं होतीं. १९५० सालीं ९२४ औषधांपैकी सुमारे ३७० म्हणजे शे. ३९ औषधें हीन सांपडलीं. १९५१ च्या सप्टेंबरपर्यंत ७०५ पैकी ३०० म्हणजे शे. ४४ औषधें हीन होतीं. ही सर्व हीन औषधें बाजारांत अस्सल म्हणून विकली जातात. आणि हा धंदा अत्यंत मोठ्या प्रमाणावर चालू आहे. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स या संस्थेची वार्षिक सभा परवां कलकत्यास झाली त्या वेळी अध्यक्षांनी हे जाहीरपणे निवेदन करून सरकारचें तिकडे लक्ष वेधलें आहे. पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन यासारखी २६ औषधें भेसळीने विकली गेल्याचे उघडकीस आले आहे. या औषधांनीं क्षय बरा व्हावयाचा असतो, रक्त शुद्ध व्हावयाचें असतें. ते कितपत साधेल हें यावरून