पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८८
भारतीय लोकसत्ता

सावध आहेत, हे दिसून येईल. परवां १३ व १४ डिसेंबरला कलकत्त्याला त्यांची दोन भाषण झाली. त्यांत 'पंचवार्षिक योजना ही पूर्ण निर्दोष नाहीं, तिच्यांत पुष्कळ उणीवा आहेत याची जाणीव आम्हांला आहे, प्रमाद— सुधारणा, प्रमाद— सुधारणा याच मार्गाने आम्ही जात आहो', असे प्रत्येक वेळीं पंडितजींनी सांगितले आहे. मागें प्रांतिक विकास योजनावर डॉ. ग्यानचंद यांनी जो अहवाल लिहिला त्याला प्रस्तावना जोडून 'सरकारी कारभारांत डॉ. ग्यायचंद यांनी दाखविलेले दोष त्यांच्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत.' असे लिहून त्यांच्या टीकेला पंडितजींनी दुजोराच दिला आहे. अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी कर्जत योजनेवर केलेली टीका वर दिलीच आहे. तेव्हां चालू योजना व एकंदर सरकारी कारभार याविषयीं सरकारी अधिकारी आणि जनता व तिच्या बाजूनें लेखणी उचलणारे पंडित यांच्या भूमिका मुळांतच भिन्न आहेत असें समजण्याचें कारण नाहीं. अधिकारावर असणाऱ्या प्रत्यक्ष कारभार हांकणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याला ज्या वाजवी मर्यादा पडतात तेवढ्यामुळे टीकेत काय फरक होत असेल तेवढाच. हे सर्व ध्यानांच घेऊनच आपण आपले धोरण निश्चित केले पाहिजे.

सार्वत्रिक उत्थान

 पंडितजींच्या भाषणांतील एकदोन सूचक उद्गारांवरून त्यांची या योजनाकडे पहाण्याची दृष्टि कोणची आहे ते कळून येईल. ते म्हणतात की, 'पंचवार्षिक योजना ही एक योजना म्हणून तिच्याकडे न पहातां हा देशापुढील प्रश्न सोडविण्याचा एक मार्ग, या दृष्टीने पहा. ही योजना सदोष असली तरी पुढील निर्दोष पंचवार्षिक योजनेचा पाया तरी हिच्यामुळे खास घातला जाईल.' यादृष्टीने आपण पाहूं लागलों तर या योजनेचा एक निराळाच फलितार्थ आपणास दिसूं लागेल. आज सर्व भारतांत हजारों ग्रामांतून, नगरांतून सरकारने आंखलेल्या योजनांच्या साह्यासाठी, आणि त्यांनाहूनहि विशेष म्हणजे तशी कांहीं योजना नसतांना स्वतंत्रपणे स्वतःच्याच प्रेरणेनें, शेकडों लोक संघटित होऊन, आपला गांव संघटित करून, त्याच्या विकासाची योजना आखीत आहेत आणि स्वतःच्या हिंमतीवर व जबाब