पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३०
भारतीय लोकसत्ता

याच्याशीं तह केला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची त्याची भाषणे राष्ट्रनिष्ठा, पूर्वपरंपरेचा अभिमान, मातृभूमीचें श्रेष्ठत्व यांनीं इतकी अलंकृत झालेली आहेत कीं, क्षणभर वीर सावरकरांचींच भाषणे हा पाठ म्हणून दाखवीत आहे की काय, असा भास व्हावा. १९४५ सालीं जपानचा पराभव होऊन त्याचें सैन्य चीनमधून परत गेले; त्यावेळी चिआंग कै शेकची व माओची अशा दोन सत्ता तेथें प्रस्थापित होऊं पहात होत्या. त्यांतील कोणच्या सत्तेशीं स्टॅलिननें तह केला ? मान्यता कोणच्या सत्तेस दिली ? दलितांचा कैवार घेऊन उठणारी, शेतकऱ्यांचे राज्य जिने कांही भागांत प्रत्यक्ष प्रस्थापित केले होते अशी, मार्क्सवादावर अनन्य निष्ठा ठेवणारी, जमीनदार भांडवलदार यांचा नायनाट करणारी अशी जी माओची सत्ता तिला स्टॅलिननें मान्यता दिली नाहीं. विरोधविकासवादावरील आपल्या निबंधांत प्रस्थापित सत्ता कितीहि बलिष्ठ दिसली तरी नव्या उदयोन्मुख सत्तेलाच ती कितीहि क्षुद्र दिसत असली तरी- खऱ्या मार्क्सवादानें पाठिंबा दिला पाहिजे असे त्यानें सांगितले आहे. असे असून, अमेरिकेने ज्या प्रतिगामी, सुलतानी, सैतानी, अधोगामी चिआंग कैशेकच्या सत्तेला पाठिंबा दिला, तिलाच स्वत: स्टॅलिननें साद घातली. त्यानें चिआंग कैशेकलाच मान्यता दिली. हिटलर, चिआंग कैशेक हेच स्टलिनचे दोस्त होते. त्यानें लांडग्याच्या जातीचेच दोस्त निवडले. मधूनमधून तोंडी लावायला इतर देशांतील कामगारपक्षरूप शेळ्यांना तो जवळ करतो हें खरें. त्या वेळीं तो भाषणेहि उदात्त करतो; पण राष्ट्रीय हिताचा प्रश्न आला की तो हिटलर, चर्चिल, चिआंग यांच्या गटांत सामील होतो व मग सगळे मिळून शेळयांचा समाचार घेतात.
 स्टॅलिनचें हें चरित्र अगदीं उघडे व जगजाहीर असे आहे. त्यांत गूढ, अनाकलनीय असे कांहीं नाहीं. १९२६ साली त्यानें राष्ट्रीय समाजवादाचें धोरण जाहीर करतांच जगांतील, निदान हिंदुस्थानांतील कम्युनिस्टांनीं सावध व्हावयास हवें होतें. १९३८ सालीं त्याने हिटलरशी सख्य केले तेव्हां तर त्यांच्या डोळ्यांत चरचरीत अंजन पडावयास हवें होते. पण आपल्या दुर्दैवानें तसे झालें नाहीं व अजूनहि कम्युनिस्टांची सोव्हिएटनिष्ठा कमी होत नाहीं. कित्येक मुसलमानांची भारतबाह्य निष्ठा जितकी घातक आहे तितकीच कम्युनिस्टांची ही भारतबाह्य निष्ठा घातक आहे व